घरताज्या घडामोडी25 टक्के वेतन कपातीस विरोध

25 टक्के वेतन कपातीस विरोध

Subscribe

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य शासनाला आवाहन

नाशिक : राज्य शासनाने सर्व संवर्गातील शासकीय कर्मचार्‍यांचे सरसकट 25 टक्के वेतन कपातीबाबत निर्णय आहे. त्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने विरोध केला असून, सरसकट कपात न करता आरोग्य व पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांचे वेतन कपात केल्यास त्यांचे खच्चिकरण होईल, असे मत संघटनेचे नाशिकचे अध्यक्ष विजयकुमार हळदे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. त्यानुसार, शासनाने जिल्हा परिषद सेवक यांच्याबाबत कोणत्याही संघटनेशी 25 टक्के वेतन स्थगित ठेवणे, दोन टप्प्यात देण्यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी चर्चा केलेली नाही. वास्तविक निर्णय घेण्यापूर्वी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु, शासनाने अत्यंत घाईगर्दीने निर्णय  घेतलेला आहे. ही वेळ वाद घालण्याची नाही. मात्र, राज्याच्या अथवा देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत सेवक सातत्याने शासनाचे पाठीशी उभी असतात, हे देखील शासनाला अवगत आहे. असे असतांनाही 25 टक्के वेतन सरसकट स्थगित करणे निश्चितच उचित नाही. शासनाने आरोग्य कर्मचारी व पोलिस सेवक यांना पूर्ववत शंभर टक्के वेतन देण्यासंदर्भात अजूनही फेरविचार करावा. याबाबत लवकरच राज्य स्तरावर योग्य वेळी आवाज उठविला जाईल,असेही हळदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -