दहिवडला शॉक लागून मोराचा मृत्यू

मृत मोराचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झांबरे यांनी शवविच्छेदन करुन वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या आवारात केले दहन

Peacock dies of shock in Dahiwad
Peacock dies of shock in Dahiwad
देवळा : दहिवड (ता. देवळा) येथे विजेचा शॉक लागून मोराचा मृत्यू झाला. वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोराला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहिवड (ता. देवळा) येथील पिंपळे मळ्यात लक्ष्मण वाघ यांच्या घराजवळील ११०० के. व्ही. विद्युत वाहिनीचा राष्ट्रीय पक्षी मोराला शॉक लागल्याने यात तो मृत झाला. याची माहिती स्थानिक विद्युत कर्मचारी शामकांत अहिरे यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा बंद करून मोराचे शव वन विभागाच्या सल्ल्यानुसार खाली उतरवले. मृत मोराचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झांबरे यांनी शवविच्छेदन करून वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दहन करण्यात आले. यावेळी पक्षी प्रेमी व प्रहार संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष संजय देवरे, वनसेवक आण्णा सावकार, वनपाल अधिकारी माणिक साळुंके, परीमंडळ अधिकारी अरुण मोरे गफ्फार तांबोळी, पंढरीनाथ वाघ, पिंटू बागुल, वाघ सर आदींसह शेतकरी उपस्थित होते.