घरताज्या घडामोडीमुक्त विद्यापीठात पीएच. डी.च्या मौखिक परीक्षा ऑनलाईन

मुक्त विद्यापीठात पीएच. डी.च्या मौखिक परीक्षा ऑनलाईन

Subscribe

महाराष्ट्रासह चंदीगडच्या 35 परीक्षार्थींचा सहभाग; महाराष्ट्राचे सचिव अतुल पाटने यांनीही दिली परीक्षा

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पीएच. डी. शिक्षणक्रमाची मौखिक परीक्षा (व्हायवा) ऑनलाईन पार पडली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या संकल्पनेतुन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परीक्षेस ‘मुक्त’च्या कर्मचार्‍यांसह 35 विद्यार्थी सहभागी झाले. विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेतर्फे मौखिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
मुक्त विद्यापीठाने टाळेबंदीवर मार्ग शोधत ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन सुरू ठेवले आहे. वेब रेडिओ, तसेच ऑनलाईन व्हिडीओ लर्निंग सुविधा सातत्याने सुरू आहे. या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून पीएच. डी. ची मौखिक परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र शासनात सचिवपदी कार्यरत असलेले अतुल पाटने हे विद्यार्थी होते. ‘लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्व-महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानात संदर्भात विशेष अभ्यास’ असा पीएच.डी. चा विषय होता. जवळपास दोन तास हा ऑनलाईन मौखिक परीक्षा सुरू होती. अतुल पाटणे यांनी पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनद्वारे 125 स्लाईडसच्या साहाय्याने मुंबईवरून त्यांच्या विषयाचे सादरीकरण केले. त्यानंतर परीक्षकांनी व उपस्थित तज्ज्ञांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेत. विद्यापीठाच्या कॉन्फरन्स रूममध्ये कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, मानव विद्या शाखेचे संचालक प्रा.उमेश राजदेरकर, विद्यापीठातील डॉ. हेमंत राजगुरू, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. प्रवीण घोडेस्वार, डॉ. नागार्जून वाडेकर व डॉ. प्रकाश बर्वे उपस्थित होते. या परीक्षेचे परीक्षक डॉ. शोभा कारेकर पुण्यावरून, डॉ. बालाजी कत्तूरवार नांदेडवरून उपस्थित होते. चंदीगड येथून अधिकारी नीलकंठ आव्हाड, मुंबई येथील सहआयुक्त अर्चना कुळकर्णी, अकोल्यावरून शिक्षणतज्ञ प्रा संजय खडक्कर, नागपूर येथून डॉ. संजय इंगोले, मुंबई येथून डॉ. नाखले, नांदेड येथून डॉ. मोहन व विद्यार्थी मिळून एकूण 35 जण उपस्थित होते. आयोजनाची तांत्रिक बाजू कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी व चंद्रकांत पवार यांनी सांभाळली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -