मजूर घेऊन जाणारी पिकअप उलटली; २० मजूर जखमी

वडाळीभोई परिसरातील मतोबा पेट्रोलियम नजीक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

Nashik

मालेगाव तालुक्यातील माणके गावातून मजूर घेऊन हिंगणवेढ (नाशिक) येथे मजुरीसाठी जात असताना तालुक्यातील वडाळीभोई परिसरातील मतोबा पेट्रोलियमनजीक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १८ ते २० जण जखमी झाले. यातील ७ जण चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर इतर १३ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बुधवार (१० जुलै) सकाळी माणके येथून पिंपळगाव बसवंत बाजूकडे जात असताना वडाळीभोई येथील मतोबा पेट्रोलियमजवळ मजूर घेऊन जाणारी महिंद्रा पिकअप चालक वामन शांताराम पवार यांचे नियत्रण सुटल्याने गाडी उलटली. यात सोमनाथ सखाराम लहरे, विशाल बाळू सोनवणे, दीपक मच्छिंद्र पवार, परशुराम सखाराम ठाकरे, खंडू मच्छिंद्र पवार, सोमा सोनवणे, किरण सुभाष सोनवणे हे सात चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. तर मग्न विक्रम सोनवणे, देविदास शाम सोनवणे, सोमा संपत सोनवणे, रेवा दिलीप पवार, रामा रतन सोनवणे, गणेश दिलीप मोरे, ज्ञानेश्वर विक्रम सोनवणे, दादा विक्रम सोनवणे, दादा जिभाऊ वाघ, गोविंद भगवान पवार व जयराम वाघ व इतर २ ते ३ मजूर हे जिल्हा रुग्णालय, नाशिक येथे उपचार घेत आहेत. वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरला म्हणून पिकअप चालक वामन पवार याच्या विरोधात वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपपोलीस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमेश आवारे करीत आहेत.