घरमहाराष्ट्रनाशिकपंतप्रधानांच्या सभेत संघाच्या काळ्या टोपीलाही मज्जाव

पंतप्रधानांच्या सभेत संघाच्या काळ्या टोपीलाही मज्जाव

Subscribe

नगरप्रमाणे नाशिकच्या सभेलाही काळे कपडे परिधान करुन येणार्‍यांना प्रवेश बंदी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक संघाच्या पेहरावात आले. मात्र त्यांना डोक्यावरील काळी टोपी काढण्याची सूचना प्रशासनाने दिल्याची चर्चा सभास्थळी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत सुरक्षाव्यवस्थेचा अतिरेकीपणाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही पडला आगे. या सभेत संघाच्या पेहरावात आलेल्या एकाला चक्क काळी टोपी काढण्यास लावली. त्यामुळे मोदींना संघाचीही अ‍ॅलर्जी झाल्याची चर्चा सभास्थळी रंगली होती. या सभेपुर्वी काळे शर्ट परिधान करुन आलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच खिशातील कंगवा, तंबाखू पुडी, चुना डबी अशा वस्तू जप्त करण्यात आल्यात. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे खटके उडत आहेत.

शेतकऱ्यांकडून कांदाफेक होण्याची भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नाशिकच्या पिंपळगावमधील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभा होत आहे. या सभेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कांद्याला हमीभाव मिळण्याची मागणी सभेच्या पार्श्वभूमीवर जोरकसपणे पुढे आली आहे. त्यामुळे सभेत शेतकर्‍यांकडून कांदाफेक होते की काय अशी भीती प्रशासनाला आहे. त्यातच कांदा उत्पादकांनी मोदींची भेट मिळावी अशी आग्रही मागणी केली आहे. भेट न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही कांदा उत्पादकांनी दिला आहे.

- Advertisement -

सभेत काळ्या कपड्यांना बंदी

दुसरीकडे, इपीएफ पेंशनर्स असोसिएशननेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सभेला येणार्‍या नागरिक आणि कार्यकर्त्यांची कसून तपासणी होत आहे. सभेच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशवीतून आणलेले खाद्यपदार्थ यांनाही बंदी घालण्यात आली आहे. नगरप्रमाणे नाशिकच्या सभेलाही काळे कपडे परिधान करुन येणार्‍यांना प्रवेश बंदी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक संघाच्या पेहरावात आले. मात्र त्यांना डोक्यावरील काळी टोपी काढण्याची सूचना प्रशासनाने दिल्याची चर्चा सभास्थळी आहे. काळ्या कपड्यांवरील बंदीच्या प्रशासनाच्या अतिरेकी धोरणाविरोधात विविध पातळ्यांवर टीका झाल्यानंतर काळी पॅन्ट आणि सॉक्सवरील बंदी उठवली आहे.

सभेमध्ये सापांची भीती

नवीन बाजार समितीच्या जवळील (जोपूळ रोडवर) चार लाख चौरस फूट जागेत भव्य मंडप उभारण्यात आला आहे. ही जागा कुरक्ष क्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे ओसाड कुरण असल्याने पंचक्रोशीत निघालेले साप या मैदानात सोडण्यात येतात. त्यामुळे सभेत साप निघतात की काय अशी भीती सर्वसामान्यांसह प्रशासनालाही आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३५ सर्पमित्रांची नियुक्ती सभास्थळी केली आहे. काही दिवसापुर्वी सभेची तयारी सुरु असताना कोब्रा जातीचे दोन नाग आढळून आल्याने प्रशासनाला घाम फुटला आहे. त्यातील एक नाग पकडण्यात सर्पमित्रांना यश लाभले. मात्र दुसरा पळून गेल्याने चार दिवसांपासून प्रशासनाची झोप उडाल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -