घरताज्या घडामोडीनववर्षाच्या स्वागताला पोलीस; टवाळखोरांना दणका

नववर्षाच्या स्वागताला पोलीस; टवाळखोरांना दणका

Subscribe

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत नाशिककरांनी नियमांचे पालन करत जल्लोषात केले. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तीन हजार पोलीस रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी ठिकठिकाणी दणक्यात टवाळखोरांची धुलाई केली. गुरुवारी (दि.३१) रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान ३५ ठिकाणी नाकाबंदी केली. नाईट कर्फ्यूमुळे नागरिकांनी घरी राहणे पसंत केल्याने अवघे दोनच तळीराम पोलिसांच्या तावडीत सापडले.

नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, लॉन्समध्ये गुरुवारी (दि.३१) सायंकाळी विशेष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिककरांनी गो कोरोना, गो कोरोना असे म्हणत सरत्या वर्षाला निरोप दिला. मद्यमान करुन वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मुख्य रस्ते, चौकांसह ३५ ठिकाणी नाकाबंदी केली होती. शहरात ३ हजार पोलीस रस्त्यावर होते. शहरातील हॉटेल्स ११ वाजेदरम्यान बंद झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नाईट कर्फ्यू असल्याने अवघे दोन तळीराम पोलिसांना सापडले.

- Advertisement -

हॉटेल रात्री ११ वाजता बंद झाल्याने नागरिकांनी घरी राहण्याची पसंती दिली. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ कमी होती. हॉटेलमध्ये सर्वाधिक पार्सल ऑर्डरला मागणी होती. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी व भरधाव वेगाने वाहने चालकांनी चालवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस बंदोबस्तात महिला पोलिसांची संख्या लक्षणीय होती. रस्त्यावर आलेल्या तरुणाईला पिटाळत पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात ठेवल्याचे दिसून आले. अंबड, कॉलेज रोड, पंचवटी, नाशिकरोड या ठिकाणी गर्दी नियंत्रण करताना पोलिसांनी टवाळखोरांची धुलाई केली. गतवर्षी ब्रेथ ऍनालायझरच्या सहाय्याने मद्यपी वाहनचालकांची कडक तपासणी करत १८७ तळीरामांवर ड्रंक आणि ड्राईव्हच्या केस दाखल केली होती. त्या तुलनेत यंदा कोरोनामुळे ब्रेथ ऍनालायझरला बंदी असल्याने अवघे दोन तळीराम पोलिसांना सापडले. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी सरकारवाडा आणि नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येक एक गुन्हे दाखल झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -