घरमहाराष्ट्रनाशिकपंचवटीत सिलिंडरमधून गॅसचोरी, चार डिलिव्हरी बॉय रंगेहात ताब्यात

पंचवटीत सिलिंडरमधून गॅसचोरी, चार डिलिव्हरी बॉय रंगेहात ताब्यात

Subscribe

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी विडी कामगारनगर गंगोत्री विहार परिसरातून रंगेहाथ अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी २९ सिलिंडर जप्त केले आहेत. गॅसचोरीच्या घटना वारंवार उघडकीस येऊनदेखील संबंधित एजन्सीकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्यानेच हे प्रकार सुरू असल्याचे दिसते आहे. दुसरीकडे, अशा प्रकरणांच्या मुळाशी पोहोचून दोषींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही फारसा रस नसल्याचेच उघड झाले आहे.

भारत गॅस एजन्सीच्या वितरकाकडे काम करणार्‍या चौघा डिलिव्हरी बॉयला आडगाव पोलिसांनी भरलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती वापराचे तब्बल २९ सिलेंडर, गाडी असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (२ जानेवारी) विडी कामगारनगर गंगोत्री विहार परिसरात केली. गॅस चोरी करणारे संशयित आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

विडी कामगार नगरातील कॅनललगत असलेल्या सावित्रीबाई झोपडपट्टीतील राजेंद्र गजेंद्र उर्फ गजानन मोहिते, गजानन कैलास ढाले, मधुकर तुकाराम कोसे, आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते अशी अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथक शनिवारी गंगोत्री विहार परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्याकडेला एक पिवळ्या रंगाची रिक्षा (एमएच-१५ इजी-४७७९) संशयास्पद उभी असलेली दिसली. पोलिसांनी पाहणी केली असता चौघेजण एका पाईपच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडरमधून गॅस रिकाम्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गॅसची चोरी करत असल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा वस्तू कलम ३ व ७ भादंवि २८५, २८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एकूण २ लाख ३७ हजार ४९ रुपयांचा मुद्देमाल असून, त्यात एक लाख सत्तर हजार रुपयांची अ‍ॅपे रिक्षा, १४,१०६ रुपयांचे भरलेले सहा सिलिंडर, ४४ हजार ६६९ रुपयांचे भरलेले २९ सिलिंडर, ४ हजार ७०२ रुपयांचे अर्धवट भरलेले २ सिलिंडर, ३ हजार ४२२ रुपयांचे रिकामे २ सिलिंडर असा मुद्देमाल पोलिसांनी केला.

एजन्सींची बेपर्वाईदेखील संशयास्पद

नोंदणी झालेल्या सिलिंडर्सच्या डिलिवरीनंतर सायंकाळी गॅस एजन्सीने डिलिवरी न झालेली सिलिंडर्स जमा करणे घेणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांतून एजन्सींजी बेपर्वाईदेखील चोरट्यांना एकप्रकारे प्रोत्साहन देत असल्याचे दिसते आहे. यापूर्वी पाइपलाइनरोडवरील खांदवे नगर परिसरातून पोलिसांनी भरदुपारी गॅसचोरी करणाऱ्या काही डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना अटक केली होती. त्यानंतरही शहरातील अशा घटना सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास करणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -