घरमहाराष्ट्रनाशिकदरोड्यातील पल्सर सापडल्या; तपासाला दिशा मिळण्याचे संकेत

दरोड्यातील पल्सर सापडल्या; तपासाला दिशा मिळण्याचे संकेत

Subscribe

भरदिवसा मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकत एकाचा बळी घेणाऱ्या दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या तीनही पल्सर नाशिक पोलिसांना पेठरोडवर सापडल्या.

भरदिवसा मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकत एकाचा बळी घेणाऱ्या दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या तीनही पल्सर नाशिक पोलिसांना शनिवारी, १५ जूनला सकाळी पेठरोडवर सापडल्या. हेल्मेटसोबतच एक शर्टही पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केला. त्यामुळे तपासाला दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी, १४ जूनला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी लुटीच्या हेतूने दरोडा टाकल्याची घटना घडली होती. मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचा आयटी इंजिनीअर सॅम्युअल याचा मृत्यू झाला. तर, अन्य व्यवस्थापकासह अन्य तिघे जखमी झाले. सायरन वाजल्याने घाबरलेल्या दरोडेखोरांनी पोलिसांच्या भीतीने तातडीने तीन पल्सरवरुन पळ काढला होता. या तिनही पल्सर पेठरोडवरील रामशेज किल्ल्यानजीक असलेल्या आशेवाडी परिसरात मिळून आल्या. दरोडेखोरांनी हेल्मेटसह तिन्ही वाहने सोडून पळ काढला. दरम्यान, हायवेलगतच पल्सर सोडल्याने हे दरोडेखोर वाहनाला हात देऊन पुढे निघून गेले असण्याचीही शक्यता वर्तविली जाते आहे. घटनास्थळी पोलिसांना दरोडेखोरांपैकी एकाचा शर्टदेखील आढळून आला. त्यामुळे दरोड्याच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -