घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी; ६५ सिलेंडरसह एकाला अटक

नाशिकमध्ये भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरी; ६५ सिलेंडरसह एकाला अटक

Subscribe

घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असताना पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. नाशिकच्या सारजा सर्कल सर्व्हिस स्टेशनवर हा प्रकार समोर आला.

सारडा सर्कल येथील सर्व्हिस स्टेशनमध्ये बेकायदा वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणार्‍या अनधिकृत सिलेंडर अड्ड्यावर गुरुवारी ५ डिसेंबर रोजी नाशिकच्या शहर पोलिसांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी एकाला अटक केली असून ४१ भरलेले सिलेंडर आणि २४ रिकामे सिलेंडर, दोन इलेक्ट्रिक मशीन, दोन ओम्नी वाहने आणि एक छोटा हत्ती असे एकूण ३ लाख ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे. देविदास लक्ष्मण राजगुरु (वय २३, रा. भीमवाडी, गंजमाळ, नाशिक) असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शाहरुख पठाण (रा. नाशिक) असे फरार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

छाप्यात सापडले घरगुती गॅस सिलिंडर

सारडा सर्कल येथील एस. एम. हॉटेलच्या मागे इमाम शाहीबाबा दर्ग्यासमोर शाहरुख पठाण यांच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये बेकायदा घरगुती सिलेंडर इलेक्ट्रिक मशीनच्या सहाय्याने वाहनामध्ये भरला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातील अवैध धंदे कारवाई पथकास मिळाली. त्यानुसार या पथकाने गुरुवारी सर्व्हिस स्टेशनवर छापा टाकला. त्यावेळी या पथकाने देविदास राजगुरु यास मोटार मशीनद्वारे सिलेंडरमधून गॅस वाहनात भरत असताना अटक केली. घटनास्थळी पथकास ओमनी व्हॅन (एमएच १५ ई ३४८३), (एमएच १५ ए ४११७) आणि (एमएच १५ ही ७४५०) या वाहनांमध्ये सिलेंडरच्या टाक्या आढळून आल्या.

जप्त केलेला माल

  • एचपी कंपनीचे भरलेले सिलेंडर – ०४
  • एचपी कंपनीचे रिकामे सिलेंडर – ०६
  • भारत गॅस कंपनीचे भरलेले सिलेंडर – १३
  • भारत गॅस कंपनी रिकामा सिलेंडर – ०१
  • ५ किलोचे एचपी कंपनीचे रिकामे सिलेंडर – १७
  • ५ किलोचे एचपी कंपनीचे भरलेले सिलेंडर – २४
  • इलेक्ट्रिक मशीन – ०२
  • ओम्नी वाहने – ०२
  • छोटा हत्ती – ०१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -