घरताज्या घडामोडीमुलीवर बलात्कार करणार्‍या पोलिसाला १० वर्षाची शिक्षा

मुलीवर बलात्कार करणार्‍या पोलिसाला १० वर्षाची शिक्षा

Subscribe

अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार करणार्‍या पोलीस शिपायास जिल्हा न्यायाधीश सुधा नायर यांनी बुधवारी (दि.२६) १० वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास शिक्षा सुनावली. गोरक्षनाथ ऊर्फ गोरख मधुकर शेखरे (२५, मूळ रा.टेलिफोन कॉलनी, ता.दिंडोरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना ३ एप्रिल २०१७ रोजी रात्री ९.३० वाजता दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावात घडली होती.

गोरक्षनाथ शेखरे हा मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून नेमणुकीस होता. तो रजा घेवून दिंडोरी येथे आला होता. घटनेच्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोरील ओट्यावर भांडी धुत असताना तो तिच्या जवळ आला. त्याने तिला बाजूला येण्याचा इशारा केला. मात्र, त्याकडे तिने लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीस तोंड दाबून तिला बंद घराजवळील बाथरुममध्ये नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. ‘तु जर कोणास काही सांगितले तर तूला मारुन टाकीन’, अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात पोस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध नाशिक सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश सुधा नायर यांनी बुधवारी (दि.२६) शेखरे याला १० वर्ष सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास शिक्षा सुनावली. खटला सरकारी वकील कोतवाल यांनी चालविला. पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सैय्यद, प्रमोद आढाव व महिला पोलीस ज्योती उगले यांनी काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -