घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका

नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका

Subscribe

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव यांनी मनसेच्या दिलीप दातीर यांचा २८१२ मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे जगदीश पवार यांनी भाजपच्या विशाखा शिरसाठ यांचा ३ हजार ३८८ मतांनी पराभव केला. ही निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीकरुन लढविली. त्यामुळे दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचाच डंका वाजल्याचे स्पष्ट झाले.

प्रभाग क्रमांक २६ मध्ये तत्कालीन शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनसेच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाशी सामाना करावा लागला. त्यानंतर त्यांनी याच प्रभागात मनसेच्या वतीने शड्डू ठोकला. मात्र महाविकास आघाडीचे तगडे आव्हान ते पेलू शकले नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांनी दातीर यांना धोबीपछाड देत २८१२ मतांनी दणदणीत विजय मिळविला. मधुकर जाधव यांना ५८६५ तर ज्यांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणुक झाली त्या मनसेच्या दातीर याना ३०५३ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कैलास अहिरे १०२१ मते मीळवुन तिसर्‍या स्थानावर राहिले. माकपचे मोहन जाधव यांना ९८४ मते तर
अपक्ष एकनाथ साळवे ४१, व सुवर्णा कोठावदे यांना अवघी ३९ मते मिळाली. या निवडणुकीत ११ हजार ६५ इतके मतदान झाले होते.

Madhukar Jadhav
प्रभाग क्रमांक २६ चे विजयी उमेदवार मधुकर जाधव यांच्यासमवेत आनंद साजरा करताना शिवसेनेचे महापालिकेतील विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख महेश बडवे, गटनेता विलास शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, भागवत आरोटे, छबू नागरे आदी.

नाशिकरोडला राष्ट्रवादीचे जगदीश पवार यांची सरशी
नाशिकरोड येथील प्रभाग २२ च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे जगदीश पवार यांनी भाजपच्या डॉ. विशाखा शिरसाठ यांचा पराभव केला. या प्रभागातील भाजपच्या तत्कालीन नगरसेविका सरोज आहिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला. त्यामुळे त्यांच्या महापालिकेतील रिक्त जागेवर ९ जानेवारीला पोटनिवडणूक घेण्यात आली. प्रभागात मतदान केवळ ३४.४४ टक्के झाल्याने कोण निवडुन येणार याचा नेमका अंदाज व्यक्त करता येत नव्हता. शुक्रवारी (दि. १०) सकाळी येथील महापालिकेच्या कार्यालयात मतमोजणी करण्यात आली, पहिल्याच फेरीत महाआघाडीचे उमेदवार जगदीश पवार यांनी आघाडी घेतली ती शेवटच्या पाचव्या फेरी पर्यंत कायम ठेवत निवडणुकीत विजय मिळवला. तर भाजपच्या डॉ. विशाखा शिरसाठ(१५२५) त्या खालोखाल शिवसेनेचे मनोज सातपुते (१४७२) तर भाजपचे बंडखोर रामदास सदाफुले(१०७१), काँग्रेसच्या बंडखोर सारीका कीर (२२०), जितेंद्र लासुरे (२३६), नितीन जगताप(४०५), अरुण गिरजे(३९६), तर नोटा (१५०) अशी मतांची विभागणी झाली, निवडणुक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जगदीश पवार यांना प्रमाणपत्र देऊन विजयी घोषित केले. या प्रभागात सत्यभामा गाडेकर, सुनिता कोठुळे व केशव पोरजे हे तीन नगरसेवक सेनेचे असल्याने विजय मिळवणे सहज शक्य झाले.

Nashik road potnivadnuk
प्रभाग क्रमांक २२ मधील राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार जगदीश पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -