शहरात विविध संस्थांतर्फे पर्यावरण पुरक गणेशविसर्जनाची तयारी

विद्यार्थी कृती समिति आणि सेवा संस्था नाशिक करणार मूर्ती आणि निर्माल्यांचे संकलन

Nashik

गुरुवारी होणार्‍या गणेशविसर्जनानिमित्त भाविकांनी पर्यावरण देखील सांभाळले पाहिजे यासाठी शहरातील विद्यार्थी कृती समिति, नाशिक आणि द्वारकेवरील सेवा संस्था उद्या गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांचे संकलन करणार आहेत.

विद्यार्थी कृती समिति

गेल्या ८ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम विद्यार्थी कृती समितिद्वारा राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे नववे वर्ष आहे. गतवर्षी हजारो गणेश मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या या उपक्रमार्गत विद्यार्थी कृती समिती कडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात. यंदा चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


हे देखील वाचा – युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे, हे कौतुकास्पद.. – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील


गेल्या ८ वर्षांपासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणारे नाशिककरांचे गणेशमूर्ती भाविकांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारण्यात आल्या आहेत.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात तसेच नाशिककरांनी मोठ्या संख्येने देव द्या देवपण घ्या या उपक्रमात सहभागी होऊन गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे. असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे.

सेवा संस्था, नाशिक

नाशिक पुना महामार्गावरील द्वारका परिसरातील सेवा संस्था यांनी देखील नाशिक गणेश मूर्ती आणि दहा दिवस घरामध्ये असलेले निर्माल्य कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण संरक्षणच्या भुमिकेतून बाप्पाचं विसर्जन नद्यांमध्ये न करता निर्माल्य व गणेशमूर्ती संस्थेला दान करत संस्थेचे संचालक अँड.राजपालसिंग शिंदे यांनी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासंदर्भात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे संगितले.

रामकुंड आणि द्वारका येथे भाविकांनी आपली गणेश मूर्ती आणि निर्माल्य जमा करावे. अधिक महितीसाठी 9158468196 या क्रमांकावर संपर्क करावा.