घरमहाराष्ट्रनाशिकराष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिकमध्ये दाखल

Subscribe

नाशिक-पुणे रोडवरील गांधीनगर येथील कॅट्समध्ये आयोजित प्रेसिडेंट कलर्स सोहळ्याला राहणार उपस्थित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज सायंकाळी सात वाजता ओझर विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. नाशिक-पुणे रोडवरील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूल येथे ‘प्रेसिडेंट कलर्स’ सोहळयास ते उपस्थित राहणार आहेत.

गुरूवारी सकाळी ९ वाजता शासकीय विश्रामगृह येथून राष्ट्रपती आर्टिलरी सेंटरकडे रवाना होतील. गांधीनगर एव्हिएशन हे देशातील सर्वात जुने केंद्र असून, येथील एव्हिएशनने देशाच्या आर्मीत दिलेल्या प्रदीर्घ योगदानाबददल राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज प्रदान केला जाणार आहे. या प्रेसिडेंट कलर्स सोहळ्यानंतर १० किलोमीटरवरील आर्टिलरी हद्दीतील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे उभारण्यात आलेल्या रूद्रनाद संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळयानंतर राष्ट्रपतींचे पुन्हा शासकिय विश्रामगृहावर आगमन होईल. दुपारी दोन तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला असून, दुपारी ४ वाजता ते ओझर विमानतळाकडे रवाना होतील. दरम्यान, ओझर येथे राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -