घरमहाराष्ट्रनाशिकपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी साजरा झाला बेरोजगार दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी साजरा झाला बेरोजगार दिवस

Subscribe

ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन नाशिकतर्फे शहरातील सी.बी.एस. परिसरात कापला केक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१७) ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (ए.आय.एस.एफ) नाशिकतर्फे शहरातील सी.बी.एस. परिसरात केक कापून बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले ६ वर्षे जगातील सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या देशांमध्ये भारताने उच्चांक गाठावा यासाठी प्रयत्नशील आहेत, काँग्रेस पक्षाला जे ७० वर्षात शक्य झाले नाही ते तब्बल ६ वर्षांत मोदींंनी करून दाखवले आहे. देशाला दरवर्षी २ करोड (बे)रोजगार देऊ हे आपले आश्वासन मोदींनी पूर्णत्वास नेले आहे असे उपस्थित विद्यार्थी युवक प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या कार्याची दखल घेत देशभर विद्यार्थी युवक आपआपल्या परीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १७ सप्टेंबर बेरोजगार दिवस म्हणून साजरा करत आहेत. ए.आय.एस.एफ ही मागणी करत आहे की, केंद्र सरकारने मोदींच्या परिश्रमांची दखल घेऊन १७ सप्टेंबर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून जाहीर करावा अन्यथा आम्ही युवक थाळीनाद करून दिवे लावून प्रशासनाच्या विरोधात बंद पुकारू असेदेखील उपस्थितांनी सांगितले. याप्रसंगी हर हर मोदी घर घर मोदी अश्या घोषणादेखील देण्यात आल्या.

- Advertisement -

याप्रसंगी विराज देवांग, अविनाश दोंदे, तल्हा शेख, अपूर्व इंगळे, ज्ञानेश्वर काळे, मुकुंद दीक्षित, अक्षय दोंदे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -