कारागृहातील कर्मचारी निलंबित

mumbai police dies due to corona virus
प्रातिनिधीक फोटो

नाशिकरोड येथील कारागृहातील एक जणाला कामात कसूर केल्याच्या कारणास्तव निलंबित करण्यात आले आहे. या वृत्तास कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व दहा कर्मचारी यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कामात कसूर केल्याच्या कारणास्तव निलंबित केले आहे. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकरोड येथील कारागृहातील एका कर्मचार्‍याला उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.