नाशिकरोड कारागृहात मास्कच्या दोरीने कैद्याने घेतला गळफास

prisoner suicide in jail
कारागृहातील शौचालयात महिला कैदीची आत्महत्या

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईच्या एका कैद्याने मास्कच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना बुधवारी (दि.७) सकाळी ७ वाजेदरम्यान नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक संपत आडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी (३२) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात अजगर अली मन्सुरी याने मास्कच्या दोरीने गळफास घेतला. ही बाब कारागृहातील पोलीस व वैद्यकीय अधिकार्‍याच्या निदर्शनास आली. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली त्यास मृत घोषित केली. पुढील तपास पोलीस हवालदास एस. व्ही. चौधरी करत आहेत.