निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३८ गुन्हेगार तडीपार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक कारवायांवर पोलीसांनी भर दिला आहे. या अंतर्गत शहरातील १०२ गुन्हेगारांच्या तडीपारीच्या याद्या तयार करण्यात केल्या आहेत.

Nashik
Crime
प्रातिनिधिक फोटो

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधात्मक कारवायांवर पोलीसांनी भर दिला आहे. या अंतर्गत शहरातील १०२ गुन्हेगारांच्या तडीपारीच्या याद्या तयार करण्यात केल्या आहेत. ३८ जणांना शहरातून तडीपार करण्यात आले आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत व राजकीय पक्षांची त्यांचा संबंध आहे, अशा शहरातील १ हजार २५९ परवानाधारकांपैकी २२५ परवानाधारकांची २४० शस्त्र जमा करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यापैकी ८५ शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, उर्वरित शस्त्र जमा करण्याची कारवाई सुरू आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार असून शाळा-महाविद्यालय परिरसरात ते साध्या वेषात कार्यरत असणार आहेत. रात्री रस्त्यांवर उभ्या राहणार्‍या टवाळखोरांवर मोठ्या प्रमणात कारवाया सुरू असून १७५ पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातून रात्र घरफोड्या तसेच इतर गुन्हे कमी करण्यात यश आले आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत ४५ कारवाया करण्यात आल्या आहेत. तलावारीने केक कापणारे, तलवारी बाळगणारे अशांवर कारवाई केली आहे. यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असून, गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौघुले व माधुरी कांगणे आदी उपस्थित होते.

जानेवारीपासून ३० गुन्हेगार हद्दपार दारूबंदीची ३४ प्रकरणे दाखल १४५ लिटर दारू जप्त व ३५ आरोपींना अटक शस्त्र कायद्यानुसार सहा गुन्हे दाखल, दोन गावठी कट्टे, पाच काडतुसे, चार तलवारी जप्त ११३ भरधाव वाहनचालक, मद्यपान करून वाहन चालविणार्‍या ४५ जणांवर कारवाई ६७८ गुन्हेगारांना अजामीनपात्र वॉरंट आणि ४५० वॉरंट, शहरात २३९ वेळा रात्री १२ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाकाबंदी, पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरून ६१७ पोलीस कर्मचार्‍यांसह ६८३ होमगार्डही तैनात करण्यात आले आहेत.

गुन्हेगारांची चौकशी व रेकॉर्ड

दोन आठवड्यांत दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या प्रथम ७२ व शुक्रवारी (ता. २२) ७४ गुन्हेगारांची आदान-प्रदान उपक्रमाअंतर्गत चौकशी करून त्यांचे रेकॉर्ड तयार करण्यात आले आहेत. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त