घरताज्या घडामोडीकोविड रूग्णालयांसाठी नाशिकमध्ये साहित्य निर्मिती

कोविड रूग्णालयांसाठी नाशिकमध्ये साहित्य निर्मिती

Subscribe

दिंडोरी तालुक्यातील एव्हरेस्ट कंपनीला शासनाकडून परवानगी

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे रुग्णालयाची अपुरी संख्या यामुळे शासनाकडून शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. भविष्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्यास वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने बांधकाम साहित्य निर्मिती क्षेत्रात काम करणार्‍या एव्हरेस्ट समुहाच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील प्लँटला तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्यासाठी लागणार्‍या साहित्य निमिर्तीची विशेष परवानगी दिली आहे.

करोनाशी लढा देण्यासाठी रुग्णालयांसह सध्या शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. मात्र भविष्यात शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यावर ही कोविड सेंटर इतरत्र हलवावी लागतील.
त्यामुळे भविष्यातील उपाययोजनांचा विचार करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाने
या कंपनीला शासनाची विशेष परवानगी दिली आहे. राज्यासह देशभरात ‘नॉन-एस्बेस्टॉस रुफिंग शीट आणि फायबर सिमेंट’ यांचा वापर करून तात्पुरती कोविड रुग्णालये उभारली जात आहेत. यासाठी लागणारे ‘नॉन-एस्बेस्टॉस रुफिंग शीट आणि फायबर सिमेंट’ निर्मिती नाशिकमध्ये सुरू झाली आहे. एव्हरेस्ट समुहाच्या लखमापूर येथील प्लँटमध्ये या साहित्याची निर्मिती होत असून, देशभरातील विविध राज्यात त्याचा पुरवठा सुरू आहे. रुग्ण विलगीकरण करण्यासाठी जलद खोल्या, कक्ष आदी साहित्याची निर्मिती येथे वेगाने सुरू आहे.

- Advertisement -

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परवानगी
एव्हरेस्ट कंपनीचे काम अत्यावश्यक बाबींशी निगडीत असल्याने त्यांना लॉकडाऊन काळातही
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तत्काळ विशेष परवानगी देवून त्यांचे काम सुरू करण्यात आले.
करोनाच्या संकटात या कंपनीपासून तयार होणार्‍या साहीत्य निर्मितीतून कोविड रूग्णालये जलदगतीने उभी राहू शकतील.
नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

तत्काळ परवानगी दिल्याने शासनाचे आभार
शासनाने तत्काळ परवानगी दिल्याने कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात एव्हरेस्ट समूह योगदान देवू शकले आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने दिलेल्या
परवानगीमुळेच आम्ही चांगले काम करू शकलो.
वाय. श्रीनिवास राव, कार्यकारी संचालक, एव्हरेस्ट समुह 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -