धक्कादायक! पब्जीचा नाद बेतला जीवावर

पब्जी गेमच्या आहारी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. पब्जी खेळताना आईने मोबाईल हातातून घेतल्याच्या रागातून या मुलाने विष घेतले.

Nashik
pubg game : gujarat rajkot police ban on playing pubg 10 arrested

ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पब्जी या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या सर्वत्र पब्जीची क्रेझ पाहायला मिळते आहे. अल्पवयीन मुला-मुलींसह तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. त्यातूनच शुक्रवारी, १५ मार्चला एका अल्पवयीन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. पब्जी खेळताना आईने मोबाईल हातातून घेतल्याच्या रागातून या मुलाने विष घेतले.

आकाश महेंद्र ओस्तवाल (१४, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील शिवाजीनगर परिसरात राहणारा आकाश हा लहानगा आईच्या मोबाईलमध्ये पब्जी गेम खेळत होता. त्यावेळी आकाशच्या बहिणीने चांदवड येथून आईशी बोलण्यासाठी कॉल केला. मुलीचा कॉल आल्याने आईने आकाशच्या हातातून लगेचच मोबाईल घेतला. त्यामुळे पब्जीची लेव्हल अपूर्ण राहिल्याचे आकाशच्या लक्षात आले. त्याचा राग अनावर झाल्याने त्याने घराबाहेर पडून अज्ञात ठिकाणावरून विषारी औषध आणून घरात ते प्राशन केले. त्यानंतर आकाशला उलट्या होऊन तो बेशुद्ध पडला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांनी त्याला तातडीने शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.