घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस उपआयुक्तपदी पोर्णिमा चौघुले, अपर अधीक्षपदी शर्मिष्ठा वालावलकर

पोलीस उपआयुक्तपदी पोर्णिमा चौघुले, अपर अधीक्षपदी शर्मिष्ठा वालावलकर

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महसूल व पोलीस प्रशासनातील स्वजिल्ह्यातील मूळ रहिवासी आणि कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे नियोजन सुरू असतानाच राज्यातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महसूल व पोलीस प्रशासनातील स्वजिल्ह्यातील मूळ रहिवासी आणि कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे नियोजन सुरू असतानाच राज्यातील १२ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपआयुक्त विजयकुमार मगर यांचा समावेश आहे. त्यांच्या जागेवर पौर्णिमा चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक काळात मूळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अधिकार्‍यांना आणि ज्यांचा महसूलमध्ये तीन वर्षे आणि पोलीस प्रशासनात दोन वर्षांपेक्षा जादा काळ झालेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने महसूल आणि गृह विभागास परिपत्रकाव्दारे आदेश देत मुदत पूर्ण न झालेल्यांच्या बदल्या न करण्याचे स्पष्ट केले आहे. तरीही मगर यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, मगर हे आयपीएस अधिकारी असताना व त्यांच्या गुन्हा शोध विभागाकडून गुन्हे उघडकीस आणण्यात यशस्वी ठरत असताना त्यांची नियुक्ती नागरी संरक्षण दलाचे अधीक्षक (नाशिक) पदी झाली आहे. ग्रामीण अपर पोलीस अधीक्षकांच्या रिक्त जागेवर अमरावती नागरी संरक्षण दलाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती तर पोलीस प्रबोधिनीत कार्यरत अपर अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची वाशिम अपर अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पुणे पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे यांना विशेष महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल, पुणे येथे अवनत पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

- Advertisement -

बदली झालेले अधिकारी

पौर्णिमा चौगुले, पोलीस उपआयुक्त, नाशिक शहर
जयंत मीना, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण)
विजय मगर, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक
प्रशांत विजकुमार वाघुंडे, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला
विजय सुरेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, वाशीम
मितेश घट्टे, पोलीस उपआयुक्त, पुणे शहर
अशोक मोराळे, विशेष महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बदल, पुणे
शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक
चेतना तिडके, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
डॉ. वैशाली कडूकर, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर
मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, राज्य महामार्ग पोलीस, पुणे
अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -