घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषद आरोग्य विभागात बनावट नियुक्तीपत्रांचे रॅकेट उघडकीस

जिल्हा परिषद आरोग्य विभागात बनावट नियुक्तीपत्रांचे रॅकेट उघडकीस

Subscribe

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन लाभार्थ्यांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आरोग्य विभागात नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा नवीन धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागात नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन शेकडो जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी संबंधितांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची सूचना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या भरतीसाठी 2019 मध्ये राज्य सरकारने जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहीरातीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यासाठी हजारो जणांनी अर्ज भरले होते. त्यामुळे काही भामट्यांनी अशा परीक्षांची गुणवत्ता यादी लागली आहे. त्यात तुमची निवड झाली आहे, असे सांगून अर्ज भरलेल्या उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकरोड येथील तिघा जणांकडून काही लाख रुपये घेऊन नियुक्तपत्र देतो, असे एकाने सांगितले. त्यातील एकाची आरोग्य विभागात ओळख असल्याने त्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तपास केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर यांची भेट घेऊन त्याबाबत तपास केला. तेव्हा त्यांनी आमच्या विभागात अशी कोणतीही पदभरती नसल्याचे स्पष्ट केले. यावर डॉ. कपील आहेर यांनी त्या तिघांना तुम्ही नियुक्तीपत्र आणल्यास त्यानुसार कारवाई करतो, असे स्पष्ट केले. यावर ते तिघे जण बुधवारी (दि.2) बनावट नियुक्तपत्र घेऊन येणार असल्याचे समजते. डॉ. कपील आहेर यांनी तातडीने सर्व तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना पत्र पाठवून कोणत्याही नियुक्तीपत्रावरून कोणालाही कामावर हजर करून घेऊ नये, असे बजावले आहे. त्यांनी तातडीने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना याबाबत माहिती दिली. त्या दोघांनीही या प्रकरणी संबंधितांविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता प्रत्यक्ष नियुक्तीपत्र घेऊन ते युवक आल्यानंतर त्यानंतर पुढे कारवाई केली जाणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

- Advertisement -

तारीख नसलेले नियुक्तीपत्र
लोकआयुक्त कार्यालयातील आदेशानुसार कक्ष अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावाने आदेश काढून कनिष्ठ लिपिकांच्या ६८ पदांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्याचे नमूद करण्यात आले असून त्यानुसार अक्षदा परमसिंग बटवाडा यांना तारीख नमूद न केलेले बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या नियुक्तीपत्रावर मंत्रालयातील कक्ष अधिकार्‍याची सही आहे. या पत्राला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र जोडून त्यावर अक्षदा बटावाडा यांची कनिष्ठ लिपिकपदी नियुक्ती करून मुख्यालयात रुजू केले जाणार असल्याचे नमूद केले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -