शहरासह परिसरात पुन्हा परतीचा पाऊस

या पावसामुळं शेतात काढणीला आलेल्या मक्यासह द्राक्ष, भाजीपाला आणि फळभाज्यांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकर्‍यांना मात्र धडकी भरलीय.

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणं

दोन दिवसांपासनं प्रचंड उकाड्याचा सामना करत असलेल्या नाशिककरांना आज दुपारच्या सुमारास झालेल्या तुरळक पावसाने दिलासा दिला. दरम्यान, शहरालगतच्या काही गावांमध्ये मात्र दमदार पाऊस झाला. या पावसामुळं शेतात काढणीला आलेल्या मक्यासह द्राक्ष, भाजीपाला आणि फळभाज्यांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकर्‍यांना मात्र धडकी भरलीय. गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकर्‍यांची उभी पिकं आडवी झाली होती. या नुकसानातनं बाहेर पडण्यासाठी आता पाऊस थांबण्याची गरज आहे.