घरमहाराष्ट्रनाशिकलासलगावी तासभर बरसला वळीवाचा पाऊस

लासलगावी तासभर बरसला वळीवाचा पाऊस

Subscribe

प्रचंड दुष्काळ व जीवघेण्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आज दुपारी तासभर कोसळलेल्या वळवाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

प्रचंड दुष्काळ व जीवघेण्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आज दुपारी तासभर कोसळलेल्या वळवाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. लासलगावमध्ये रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे अचानक आलेल्या पावसाने आठवडे बाजारात शेतकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली.

लासलगाव व परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. उन्हाच्या तडाख्याने चाळीशी ओलांडल्याने अंगाची लाही लाही होणार्‍या नागरिकांना या पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला. 31 मे रोजी हवामान खात्यामार्फत येत्या दोन ते तीन दिवसात वळव्याच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. रविवारी दुपारी ढगाळ वातावरण तयार होऊन साडेतीनच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
लासलगावसह परिसरातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने शेतकर्‍याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वर्षी तरी पाऊस पाणी भरपूर व्हावा एवढीच शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात लासलगावला पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. शहरात सुमारे एक तास पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासाही मिळाला..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -