घरमहाराष्ट्रनाशिकराजधानी एक्सप्रेसला १५ दिवसात हिरवा कंदील

राजधानी एक्सप्रेसला १५ दिवसात हिरवा कंदील

Subscribe

मुंबई -दिल्ली व्हाया भुसावळ ही राजधानी एक्स्प्रेस येत्या १५ दिवसात सुरू करून हिरवा कंदील देऊ, असे त्यांनी सांगितले. नागपूर ते पुणे संपूर्ण वातानुकूलित हमसफर एक्स्प्रेससुद्धा येत्या महिन्यात सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी शुक्रवारी भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी जळगाव जिल्ह्यातील रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांविषयी चर्चा केली. जळगाव जिल्ह्यातील नवीन रेल्वे, रावेर, मलकापूर येथील थांबे मिळावे याबाबत चर्चा केली. रेल्वेमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार भुसावळ- मुंबई व्हाया नंदुरबार ही नवीन रेल्वे येत्या महिन्याभरात सुरू होईल असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई -दिल्ली व्हाया भुसावळ ही राजधानी एक्स्प्रेस येत्या १५ दिवसात सुरू करून हिरवा कंदील देऊ, असे त्यांनी सांगितले. नागपूर ते पुणे संपूर्ण वातानुकूलित हमसफर एक्स्प्रेससुद्धा येत्या महिन्यात सुरू होणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

नविन एक्स्प्रेस सुरु होणार

भुसावळ ते पुणे आणि भुसावळ -मुंबई ही रेल्वे सुरू व्हावी, म्हणून रक्षा खडसे सातत्याने प्रयत्नशील होत्या. विशेष म्हणजे भुसावळ ते पुणे नवीन एक्स्प्रेस सुरू करण्याची मंजुरी रेल्वेमंत्र्यांनी दिली. रावेर येथे महानगरी एक्स्प्रेसला थांबा आणि अजमेर हैद्राबाद गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा मिळण्याची मागणी होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे तो थांबा मलकापूर येथे देण्याचे रेल्वेमंत्र्यांनी मान्य केले. पाचोरा ते जामनेर ही नॅरो गेज बोदवडपर्यंत नेण्याचे तत्वतः मान्य केले.

- Advertisement -

जळगाव ते भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

भुसावळ रेल्वे स्थानकावरील नवीन प्लॅटफॉर्म सुरू होण्यासंदर्भात कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टीकडून परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसात हिरवा कंदील मिळेल. जळगाव ते भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण झाले असून या नवीन प्लॅटफॉर्मला तिसरी लाईन जोडण्यासाठी यार्डात रीमोल्डिंग काम सुरू करावे. ज्यामुळे मुंबई आणि सुरतकडे जाणार्‍या वाहतुकीचा ट्रॅफिक लोड कमी होईल. भुसावळ स्थानकावर पॅसेंजर गाड्या लेट होतात. ती अडचण दूर होऊन रावेर ते जळगाव रोज अप- डाऊन करणार्‍या हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल.

उदघाटनासाठी रेल्वेमंत्री येणार

भुसावळ येथील प्रस्तावित कोच फॅक्टरीमध्ये भरती करताना स्थानिकांना व बेघर अतिक्रमणधारकांना प्राधान्य देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. भुसावळला येथे येत्या दोन महिन्यात रेल्वेमंत्र्यांनी भेट देण्याचे मान्य केलेले आहे. विविध उड्डाणपूल (बोदवड, सावदा, निंभोरा ) आणि भुयारी मार्गाचे भूमिपूजन कामांच्या उदघाटनसाठी रेल्वेमंत्री येणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -