घरमहाराष्ट्रनाशिकमॉब लिंचिंगविरोधात शहरात मोर्चा

मॉब लिंचिंगविरोधात शहरात मोर्चा

Subscribe

हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित

मॉब लिंचिंग संदर्भात शहरात आज (सोमवार) सकाळी जुने नाशिक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. देशभरात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांविरुद्ध बहुजन मुस्लीम संघर्ष समितीच्या वतीने मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ जुन्या नाशकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो मुस्लीम बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवत अशा घटना रोखण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलावी अशी मागणी केली. यामध्ये प्रामुख्याने यांसारख्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करून त्यांची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हायला हवी. आरोपींना फाशी किंवा जन्मठेप यासारख्या शिक्षेची तरतूद व्हायला हवी.

मोर्चा निघण्यापूर्वी राष्ट्रीय एकात्मतेसाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब यांनी दुवा पठन केली. मॉब लिंचिंग विरोधात कायदा बनवावा, अल्पसंख्यांक समुदायासाठी विशेष अक्ट्रोसिटी कायदा बनवावा, शिक्षणातील आरक्षण तातडीने लागू करावे, मॉब लिंचिंगमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची तातडीने मदत द्यावी, खोटे गुन्हे मागे घेऊन त्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्याची तरतूद करावी तसेच मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये सरकारचा हस्तक्षेप थांबवावा. आदी मागण्या मोर्चातून मांडण्यात आल्या.

- Advertisement -

तत्पूर्वी मोर्चा निघताना मोर्चाच्या अग्रभागी राष्ट्रीय ध्वजांसोबतच मॉब लिंचिंग घटनेचा निषेध म्हणून मोर्चेकरांनी काळे झेंडे देखील दिसून आले. यावेळी भारत झिंदाबाद, लोकतंत्र झिंदाबाद, संविधान झिंदाबाद यांसारख्या घोषणा देत जुने नाशिक पासून जिपीओ रोडमार्गे ईदगाह मैदानावर मोर्चाची सांगता झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -