घरमहाराष्ट्रनाशिकशहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी रॅली; अखिल भारतीय मराठा महासंघाचा पुढाकार

शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी रॅली; अखिल भारतीय मराठा महासंघाचा पुढाकार

Subscribe

पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सी.आर.पी.एफ.चे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने अखिल भारतीय मराठा महासंघाने शनिवारी, २३ फेब्रुवारीला सायंकाळी शहरातून रॅली काढली होती

पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सी.आर.पी.एफ.चे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने अखिल भारतीय मराठा महासंघाने शनिवारी, २३ फेब्रुवारीला सायंकाळी शहरातून रॅली काढली होती.

Morcha1
निधी संकलनासाठी काढलेल्या रॅलीत मदतीसाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

संघटनेचे सरचिटणीस अजय मराठे यांच्या नेतृत्त्वाखाली काठे गल्लीतून या रॅलीची सुरुवात झाली. शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. द्वारका सर्कल – भद्रकाली मार्केट- गाडगे महाराज पुतळा परिसर- मेनरोड – अशोक स्तंभ- रविवार कारंजा- पंचवटी असा रॅलीचा मार्ग होता. या रॅलीत संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांसह समाजाच्या विविध स्तरांतील तरुणाई सहभागी झाले होते. रॅलीमध्ये कार्याध्यक्ष दिलीप मोरे, उपाध्यक्ष महेश जाधव, विष्णु आहिरे, संपर्क प्रमुख अनिल साळुंके, कायदा सल्लागार आनंद बोंबले, प्रशांत घुले, मानवाधिकार सचिव नीलेश दुसे, शहराध्यक्षा शोभा सोनावणे, सरचिटणीस सोनल निफाडे, कार्याध्यक्षा प्रमिला पाटील, प्रसिद्धी प्रमुख रोहिणी उफाडे, रामेश्वर निर्बळ, कोषाध्यक्षा रुपाली सोनावणे आदी सहभागी झाले होते. विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर व जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्षा शशीताई आहिरे यांनी रॅलीचे अभिवादन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -