घरमहाराष्ट्रनाशिकमेमू चाचणीस ‘आरडीएसओ’चा ग्रीन सिग्नल

मेमू चाचणीस ‘आरडीएसओ’चा ग्रीन सिग्नल

Subscribe

मध्य रेल्वे मार्गाच्या समतल भागातच धावणार

मुंबई ते भुसावळ दरम्यान मेमू लोकल सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेला अखेर मुहूर्त सापडला असून, दादर ते कसारा दरम्यान मैदानी चाचणी होणार असल्याचे ‘आरडीएसओ’ (रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन)ने मध्य रेल्वेला पत्र दिले आहे. मंगळवारी (दि. २३) रात्रीपासून ८ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या चाचण्या होणार आहेत. यामुळे नाशिककरांसाठी प्रवास संजिवनी ठरलेली मेमू लोकल यशस्वी चाचणीनंतर प्रत्यक्षात सेवेत येऊ शकेल.

कल्याण-नाशिक लोकल सुरू होणार की नाही, या संभ्रमावस्थेत असणार्‍या नाशिककरांना मध्य रेल्वेने मेमू चाचणीस हिरवा कंदील दाखवून सुखद धक्का दिला आहे. मंगळवारपासून चाचणी कार्यक्रम सुरू होईल. दादर ते कसारा दरम्यानच्या वेगवेगळ्या वळणांवरही कमी जास्त वेगाने चाचणी करण्यात येणार आहे. समतल भागातील रेल्वेमार्गावर चाचणी यशस्वी झाल्यानंतर काही दिवसांत कसारा घाटात खडीने भरलेल्या गोण्या टाकून व रिकामे डबे असलेले कोच यांद्वारे रोज वेगवेगळ्या वेगाने चाचणी घेतली जाणार आहे.

- Advertisement -

‘आरडीएसओ’ व रेल्वे वाहतूक विभागांतील वरिष्ठ अधिकारी तसेच सक्षम तंत्रज्ञांकडून मेमूची चाचणी घेतली जाणार आहे. रेल्वेच्या डिझाईनची तांत्रिक माहिती संकलन केली जाणार आहे. त्यावरून त्रुटी किंवा अन्य बाबींचा अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविला जाणार आहे. अपघाताची शक्यता ठेऊन प्रत्येक घटनेच्या वेळी घ्यावयाची काळजी याबाबतही विशेष लक्ष दिले जाणार आहे. यात 2 व 3 ऑगस्ट रोजी इमर्जन्सी ब्रेक सिस्टीमची चाचणी होईल.

असे आहे नियोजन

तारीख               कोच          वेग (प्रतितास)
२३-२४(रात्र)         ८                 ८५
२४-२५(रात्र)         ८                १००
२५-२६(रात्र)          ८               ११०
२६-२७(रात्र)          ८               १२०
२७-२८(रात्र)           ८               ६५
२८-२९(रात्र)           ८                ६०

२९, ३० व ३१ ८ आवश्यक तांत्रिक सहाय्यक
१, २ व ३ ऑगस्ट ५-८ ११०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -