घरमहाराष्ट्रनाशिक‘महावितरण’च्या भरतीत ओबीसींना पंधराशे जागा

‘महावितरण’च्या भरतीत ओबीसींना पंधराशे जागा

Subscribe

जाहिरातीतील चुकीची दुरुस्ती; महावितरणने केला खुलासा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ‘महावितरण’तर्फे ५ हजार वीज सहायकांच्या पदांसाठी सुरु करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ओबीसी वर्गावर कोणताही अन्याय झालेला नाही. एका तांत्रिक त्रुटीमुळे जाहिरातीत एका वर्गाची पदसंख्या दुसर्‍या वर्गाच्या रकान्यात छापल्या गेली. ही चूक लक्षात येताच ती तात्काळ सुधारण्यात आली आहे, असा महावितरणने खुलासा केला आहे.
महावितरणने ९ जुलै रोजी रात्री १०.४० वाजता संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये चुकीने ओबीसींसाठी ८१ जागा दर्शविण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात आरक्षणाप्रमाणे १५०७ पद असायला हवे होते. ही चूक ‘महावितरण’च्या लक्षात येताच दुसर्‍या दिवशी १.३५ वाजता सुधारित (शुद्धीपत्रक) जाहिरात प्रकाशित करण्यात आली. त्यात ओबीसींच्या १५०७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले असल्याची सुधारणा करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -