घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरणार

महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय विभागातील रिक्त पदे भरणार

Subscribe

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; साथ रोग नियंत्रणासाठीही सूचना

महापालिकेत आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची ग्वाही आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तेे बोलत होते.

स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावाच्या बाबतीत नाशिक राज्यात अव्वल स्थानावर आहे. त्याचप्रमाणे शहरात डेंग्यु, मलेरिया, थंडीताप अशा आजारांची प्रादुर्भावही झपाट्याने होत आहे. ही साथ कशी रोखता येईल यावर उपाययोजना करण्यासाठी एकनाश शिंदे यांच्या उपस्थितीत आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक झाली. शिंदे यांचे स्वागत महापौर रंजना भानसी यांनी केले. यावेळी उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, किरण गामणे आदी उपस्थित होते.

बैठकीतील प्रमुख निर्णय

  • महापालिकेत पूर्णवेळ सक्षम वैद्यकीय अधिकारी देणार.
  • इमारत बांधकाम स्थळांची पाहणी करुन पाणी तुंबणार्‍या कन्स्ट्रक्शन्सवर कारवाई करणार.
  • दिल्लीच्या धर्तीवर शहरात दहा ‘आपला दवाखाना’ सुरु करणार.
  • साथीचे आजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेसाठी औषधांचा साठा पाठवणार.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -