घरमहाराष्ट्रनाशिकलग्नास नकार दिला : तरुणाचा धारदार हत्याराने युवतीला ठार मारण्याचा प्रयत्न

लग्नास नकार दिला : तरुणाचा धारदार हत्याराने युवतीला ठार मारण्याचा प्रयत्न

Subscribe

ओझरपासून जवळच असलेल्या शिलेदारवाडी येथील एका मुलीने व तिच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरून तिच्यावर प्रेम असलेल्या तरुणाने धारदार हत्याराने प्रेयसीच्या पोटात व पाठीवर वार करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ओझर शिवारात घडली असून या प्रकरणी संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शिलेदार वाडी, दीक्षी येथील एका मुलीवर सागर प्रभाकर गायकवाड (वय 26, रा. मोढे वस्ती ,ओझर) याचे प्रेम होते. त्याने तिच्यासह आई-वडिलाकडे लग्नासाठी विचारणा केली असता त्या तिघांनी नकार दिला होता. याचा राग मनात धरून दि. २६ रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास सागर गायकवाड तिच्यासह कामावरून घरी जात असताना ओझर शिवारातील चारी नं. १६ जवळ आले असता सागरने धारदार हत्याराने तिच्या पोटात व पाठीवर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर ओझर येथे प्रथमोपचार करून नाशिक येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात ओझर पोलिसांनी सागर गायकवाडला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहेत.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -