घरमहाराष्ट्रनाशिकसहकार अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना अटक

सहकार अधिकाऱ्याला २० हजारांची लाच घेताना अटक

Subscribe

सावकारीच्या व्यवसायासाठी परवाना देण्याच्या बदल्यात २० हजारांची लाच घेणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रकाश रामदास शिंपी यांना अँटी करप्शन ब्युरोच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहाथ अटक केली.

सावकारीच्या व्यवसायासाठी परवाना देण्याच्या बदल्यात २० हजारांची लाच घेणाऱ्या उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रकाश रामदास शिंपी यांना अँटी करप्शन ब्युरोच्या (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार शिंपी यांनी त्यांच्याकडे ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्याचा पहिला हप्ता म्हणून त्यांनी २० हजारांची लाच स्विकारली.

उपनिबंधक कार्यालयात सहकार अधिकारी वर्ग-३ या पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश शिंपी यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ४० हजारांची रक्कम देण्याचे ठरले. या रकमेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराने २० हजारांची लाच आणली होती. मात्र, तत्पूर्वी तक्रारदाराने अँटी करप्शन ब्युरोला यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार ब्युरोच्या पथकाने कार्यालयात सापळा रचला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -