घरमहाराष्ट्रनाशिक’प्रोजेक्ट गोदा’चा पुनर्विचार

’प्रोजेक्ट गोदा’चा पुनर्विचार

Subscribe

प्रकल्पांतर्गत होणारी सर्व विकास कामे ही लाल आणि निळ्या पूररेषेबाहेर केली जाणार आहेत. या विकास कामांसोबतच कृत्रिम कुंड बसवले जाणार आहेत. भाविकांच्या स्नानानंतर हे पाणी ठराविक वेळेत काढून घेतले जाईल. जेणेकरुन गोदावरी प्रदूषण टळेल.

महापुराने गोदाकाठच्या नागरी वस्तीसह विविध प्रकल्पांना तडाखा दिल्याने खडबडून जाग्या झालेल्या स्मार्ट सिटी कंपनीनेही आता ९४ कोटींच्या ’प्रोजेक्ट गोदा’बाबत सावध पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत गोदापात्रामधील अडथळे दूर करण्यासह सौंदर्यीकरण, विस्तीर्ण जागेवरील दिमाखदार उद्यान अशा कामांचा अंतर्भाव असल्याने कंपनीने हा प्रकल्प पुनर्विचारासाठी संबंधित सल्लागार संस्थेकडे पाठवला आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ’प्रोजेक्ट गोदा’ हाती घेतला जाणार आहे. त्यात पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील अडथळे दूर करणे, नदी स्वच्छता अशा कामांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ५५.५ कोटी निधी अपेक्षित असलेल्या या प्रकल्पासाठी तब्बल ९४ कोटींचा निधी लागणार आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात गोदावरील स्वच्छता आणि गाळ काढला जाईल. त्यानंतर गोदापात्रातील काँक्रिटीकरण काढले जाईल. तसेच, होळकर पुलाखालील बंधारा काढून रामकुंडापासून पुढे काही अंतरावर स्वयंचलित गेट बसवले जाणार आहेत. यासोबतच पारंपरिक धोबीघाटदेखील काढला जाणार आहे. नदीतील सर्व अडथळे हटवत पूरप्रभाव कमी करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. याशिवाय तब्बल ५५ कोटी रुपये खर्चून भव्य उद्यान साकारले जाईल. स्पिरिच्युअल झोन असेल. तसेच, ९ हजार ८५० स्क्वेअर मीटर परिसरात गोदा गार्डन साकरले जाईल.

या प्रकल्पांतर्गत होणारी सर्व विकास कामे ही लाल आणि निळ्या पूररेषेबाहेर केली जाणार आहेत. या विकास कामांसोबतच कृत्रिम कुंड बसवले जाणार आहेत. भाविकांच्या स्नानानंतर हे पाणी ठराविक वेळेत काढून घेतले जाईल. जेणेकरुन गोदावरी प्रदूषण टळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -