घरमहाराष्ट्रनाशिकडॉक्टरांचे निवृत्ती वय आता ६२

डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ६२

Subscribe

राज्य शासनाचा निर्णय, परिपत्रक केले जारी

नाशिक शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिक आणि रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला आहे. राज्यातील रुग्णसेवा देणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवृत्तीचे वय आता ६० वरून ६२ केले आहे. ही निवृत्ती वयोमर्यादा वाढ प्रशासकीय अधिकार्‍यांना होणार नसल्याचेही राज्यशासनाने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, राज्य कामगार विमा रुग्णालय येथे आरोग्य सुविधा दिले जाते. या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकार्‍यांची कमतरता असल्याने राज्यातील त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. याप्रकरणी राज्यातील सामाजिक संघटना, समाजसेवक, लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांच्या रिक्त पदांबाबत चिंता व्यक्त करत सेवानिवृत्ती वय वाढवण्याबाबत आरोग्य विभागाला निवेदन सादर केले होते. त्यामुळे राज्यशासनाने रुग्णसेवा देणार्‍या अधिकार्‍यांचे सेवानिवृत्ती वय आता ६० वरून ६२ वर्षे करण्याचा शासननिर्णय सोमवारी (ता.१) घेतला. हा शासन निर्णय प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना लागू नाही. रुग्णसेवा देण्यात येत असलेल्या पदावर कार्यरत आहेत, त्यांनाच ही वयोमर्यादेतील वाढ लागू केली आहे.

- Advertisement -

वयोमर्यादेत वाढ होणारे अधिकारी

शासननिर्णय आरोग्य सेवा संचालनालयातील महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा, गट-अ मधील वैद्यकीय अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेषज्ञ संवर्गमधील पदे व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट- अ यांना लागू राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -