घरमहाराष्ट्रनाशिकप्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारयांचा घंटानाद आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारयांचा घंटानाद आंदोलन

Subscribe

मागण्या मान्य होउनही त्याची अंमजबजावणी न झाल्याने कमर्चाऱ्यांमध्ये नाराजी

महसुल कर्मचा-यांच्या मागण्या तत्वत:मान्य होवूनही पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही या मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस नरेंद्र जगताप यांनी शासनाने दिलेले आश्वासन पुर्ण करण्यासाठी जाग आणण्यासाठी हे घंटानाद अंदोलन राज्यभर होत असून शाासनाने आजूनही दुर्लक्ष केल्यास ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला. एकिकडे महापालिका, नगरपालिका कर्मचारयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र महसूल कर्मचारयांच्या मागण्या मान्य होउनही त्याची अंमजबजावणी होत नसल्याने नाराजी दर्शविण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ, जिल्हा सरचिटणीस गणेश लिलके, कोषाध्यक्ष रमेश मोरे, योगेश कोतवाल.नाना पर्वते, गोंडाळे, विलास वैदय आदिंसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

  • सहाव्या वेतन आयोगानुसार नायब तहसिलदारांचा ग्रेड पे 4300 वरून 4600 रूपये करावा.
  • महसुल लिपिकाचे पदनाम बदलून महसुल सहाय्यक करावे.
  • नायब तहसिलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 वरून 20 टक्के करण्यात यावे.
  • शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी.
  • आकृतीबंध सुधारणेसाठी दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावीत.
  • संजय गांधी, निवडणूक, रोहयो, गौण खनिज, जात प्रमाणपत्र देणे आदी विभागांसाठी नविन आकृतीबंध तयार करावा.
  • नायब तहसिलदार, तहसिलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी गृह विभागाच्या धर्तीवर महसुल कर्मचार्यांसाठी 5 टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -