घरमहाराष्ट्रनाशिकशिखर बँकप्रकरणी रोहित पवारही ईडीच्या जाळ्यात

शिखर बँकप्रकरणी रोहित पवारही ईडीच्या जाळ्यात

Subscribe

नाशिकमधील पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमैया यांचा गौप्यस्फोट

शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनंतर भाजपने थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना लक्ष्य केले असताना आता रोहित पवारांवरही जाळे टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि. १६) झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी रोहितचही ईडीने चौकशी सुरू केल्याचा आरोप केला. ऐन निवडणूक काळात सोमैया यांनी माध्यमांना दिलेली माहिती पवारांच्या अडचणीत वाढ करण्यासाठीच असल्याचे बोलले जाते.भाजप नेते किरीट सोमैया यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमलबजावणी महासंचालनालयाने (इडी) चौकशी सुरू केल्यावरून नुकतेच ‘राजीनामा नाट्य’ घडलेले असताना भाजपचे नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांचीही ईडीने चौकशी सुरु केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे संपूर्ण पवार कुटूंबच या घोट्याळ्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सोमय्या नाशकात आले होते. यावेळी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्र सदन आणि सिंचन प्रकरणातील दोन्ही घोटाळ्यांचे निष्कर्ष पुढील पाच वर्षात निघतील असे वाटले होते. यातील महाराष्ट्र सदन घोटाळा न्यायालयात निष्कर्षापर्यंत पोहचला असून सिंचन घोटाळ्यावर सुनावणी सुरु आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांची चौकशी चालू आहेच. शिखर बँकेच्या घोटाळ्यातही अजित पवारांची चौकशी सुरु असताना त्यांचे पुतणे रोहित पवार यांचीदेखील ईडी चौकशी करीत असल्याचे समजते.

बघा काय म्हणाले सोमय्या…

सोमय्यांचे टिकास्त्र : शिखर बँकप्रकरणी रोहित पवारही ईडीच्या जाळ्यात

नाशिकमधील पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी साधला निशाणा

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಅಕ್ಟೋಬರ್ 16, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -