घरमहाराष्ट्रनाशिकसपकाळ कॉलेजात महिन्यापासून लेक्चर्स बंद

सपकाळ कॉलेजात महिन्यापासून लेक्चर्स बंद

Subscribe

लेक्चर सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रास निवेदन

त्र्यंबकेश्वररोडवरील सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र शाखेच्या तासिका त्वरित करण्याची मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रास यासंदर्भात निवेदन दिले.

सपकाळ महाविद्यालयात १ जानेवारीपासून एकही लेक्चर झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. नाशिकमधील सपकाळ अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नियमित लेक्चर बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कॉलेज पूर्ववत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील विद्यार्थ्यांनी दिला. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगर सहमंत्री विलास ठाकरे, नगर मंत्री अजय कनोजे, अथर्व कुळकर्णी, भूषण कामडी, सौरभ धोत्रे, राकेश साळुंके, सुयश सोनी, राहुल भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -