घरताज्या घडामोडीहैदराबाद पोलिसांविरोधात सराफ असोसिएशन करणार राज्यभर आंदोलन

हैदराबाद पोलिसांविरोधात सराफ असोसिएशन करणार राज्यभर आंदोलन

Subscribe

हैदराबाद पोलिसांनी नाशिकमध्ये स्थानिक पोलिसांची मदत न घेता परस्पर सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना अटक केल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी हैदराबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणवे अन्यथा हैदराबाद पोलीसांविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नाशिक सराफ असोसिएशनने दिला आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन मंगळवारी (दि.२५) सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली. त्यांना नाशिक शासकीय विश्रामगृहातील चौथ्या मजल्यावरील खोलीत आणले. त्या ठिकाणी बिरारी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस हैदराबाद पोलीस जबाबदार आहेत. त्यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी. पोलिसांनी अटक करण्यापुर्वी स्थानिक पोलिसांची मदत घेतली नसल्याचे समोर आले असून कारवाई करण्याची पद्धती चुकीची आहे. नाशिक सराफ असोसिएशन हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.

- Advertisement -

बुधवारी सराफ दुकाने राहणार बंद

हैदराबाद पोलिसांनी सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. त्यांच्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्यात सराफ दुकाने बंद ठेवून निषेध केला जाणार आहे. आंदोलनात सराफ व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक सराफ असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -