घरमहाराष्ट्रनाशिकएकीकडे युतीसाठी आणाभाका; स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांना लाथा

एकीकडे युतीसाठी आणाभाका; स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांना लाथा

Subscribe

सेना- भाजपमधील बेबनाव वाढला; ठिकठिकाणी रंगतेय मानापमान नाट्य

एकीकडे शिवसेना आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी युती होणार असल्याचे स्पष्ट करताना दुसरीकडे नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या वादाचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युतीबाबत पालकमंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्याकडून वारंवार काहीना काही वक्तव्य येत आहेत. खा. राऊत यांनी युतीचा फार्म्यूला हा पन्नास-पन्नास टक्के जागांचा असेल असे स्पष्ट केले. तर महाजन यांनी मात्र असा फार्म्यूलाच ठरला नसल्याचे सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विद्यमान आमदार वगळता उर्वरित जागांवर पन्नास-पन्नास टक्के जागांचे वाटप केले जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे युतीबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र युती होणारच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वादावर पडला पडलल्याचे चित्र दिसत असताना आता स्थानिक पातळीवर या दोघा पक्षांमध्ये वाद निर्माण होत आहे.

- Advertisement -

स्थानिक भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेला दूर ठेवले जात असल्याची भावना शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या दुजाभावाविरोधात पालकमंत्री गिरीश महाजन आणि संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे. युतीधर्म पाळला जावा, अशी मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांची भूमिका असताना आमदारांना मात्र शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे वावडे असल्याचा आरोप करत विधानसभा जवळ असल्याची आठवण त्यांनी करून दिली. नाशिकमध्ये भाजपकडून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना डावलले जात असल्याची तक्रार संतप्त शिवसेना नगरसेवकांकडून विरोधी पक्षनेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे बोरस्ते यांनी भाजपला युती धर्माची आठवण करून दिली आहे. सध्याच्या परिस्थीतीत भाजप व शिवसेनेने सोबत कामे करणे गरजेचे आहे.


हे ही वाचा – नियोजित सेंट्रल पार्क हे ठिकाण नाशिक शहरातील सर्वात सुंदर व आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार – महाजन

- Advertisement -

वरिष्ठ नेते संयम ठेवण्याचे सांगत असल्याने आम्ही भाजपसोबत आहोत. परंतु, भाजपचे काही आमदार महापालिकेच्या निधीच्या कामांना वैयक्तिक सोहळ्याचे स्वरुप देऊन शिवसेनेला डावलत असल्याचा आरोप बोरस्तेंनी केला आहे. नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पंचवटीत नाट्यगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शिवसेनेला डावलले होते. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी शनिवारी सिडकोतील पेलिकन पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी तोच कित्ता गिरवला आहे. या कामासाठी महापालिकेने १० कोटी रुपये दिले. परंतु, शिवसेनेला त्यासाठीचे साधे निमंत्रण दिले नाही, असे बोरस्ते म्हणाले.

भाजपच्या प्रकरणांमुळे युतीची बदनामी

आरक्षण बदलाच्या प्रकरणावरून भाजपचे आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांच्यावर भाजपचेच गटनेते जगदीश पाटील यांनी आरोप करुन लाय डिटेक्ट टेस्ट करण्याची मागणी केली. पाटील यांनी फोडलेल्या या लेटर बॉम्बवरदेखील अजय बोरस्ते यांनी भाष्य केले असून भाजपने हे लेटर बॉम्ब एका रुममध्ये बसून फोडावेत, असा टोला लगावला आहे. अशा प्रकरणांमुळे युतीची बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -