घरमहाराष्ट्रनाशिकज्येष्ठ नागरिक विशिष्ट ध्येयासाठी धावलेली पिढी

ज्येष्ठ नागरिक विशिष्ट ध्येयासाठी धावलेली पिढी

Subscribe

लोकज्योती वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आ.हेमंत टकले यांचे प्रतिपादन

आदाराने ज्येष्ठांपुढे लवुन नमन करण्याचे साध्ये सौजन्य आताच्या पिढीत नाही, तिच पिढी आता मोठी झाली आहे. पण समाजाची सावली, आदर्श म्हणुन जी ज्येष्ठ नागरिकांची ओळख आहे, त्यांची पिढी ही एका विशिष्ट ध्येयाने धावलेली आहे. त्यांनी दूसर्‍यांना मोठे करताना स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घातलेली आहे. अशा ज्येष्ठांची गरज आजही समाजाला आहे, अशी प्रतिपादन आमदार हेमंत टकले यांनी केले.

कालीदास कलामंदिर येथे साप्ताहित लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचाच्या वर्धापन दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ. हेमंत टकले उपस्थित होेते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर,जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. सुनील सोनार, ब्रिजमोहन टुरिझमचे ब्रिजमोहन चौधरी,  ज्येष्ठ नागरिक मंचाचे रमेश डहाळे, सुरेश विसपुते, भा.रा. सूर्यवंशी, डी.एम. कुलकर्णी, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 90 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रेय दशपुते, श्रीमती पार्वताबाई रघुनाथ येवले,  वसंत दगडु आहिरे, विद्याधर पाध्ये, रमनबाई बाबुलाल येवले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार सुधीर कुलकर्णी, प्रशांत कोतकर, राजेंद्र देशपांडे, योगेश गांगुर्डे यांना गौरविण्यात आले. तर लोकज्योती वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

आयुष्य वाढते म्हणजे एक सामाजिक भान येते. उतार वयात राग येण्याच्या अनेक गोष्टी घडत, असतात त्याकडे दूर्लक्ष करण्याचा सल्ला आ. टकले यांनी देताना ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले की, तुमच्या अनुभवाची गरज आताच्या समाजाला आहे. चौकोनी कुटुंबात अनेक समस्या आहेत.त्यांचे निराकरण ज्यष्ठांच्या सहवासानेच होते. वय वाढते तसे आजारपणाने डोकेवर काढण्यास सुरूवात केलेली असते. आनंदात दिनक्रम व्यतित केला तर शारिरीक व्याधी विसरता येतात, मरावे परि किर्ती रूपी उरावे, हे कोणत्या नेत्या किंवा मोठ्या व्यक्तीसाठी नसून, घरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू होणारे सत्य आहे, असे आ. टकले म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते काकासाहेब सोलापुरक पुरस्कार मिळाल्याबदल देवराम सैंदाणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जैन सोशल ग्रुप मेट्रोचे अध्यक्ष रंजनभाई शाह यांचा सत्कार विश्वास ठाकूर यांनी केला. तसेच वसंतराव पुंड, श्रीकृष्ण शिरोडे यांचा सत्कार डॉ. सुनील सोनार यांनी केला. सुत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. आभार विठ्ठल सावंत यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक, त्यांचे नातेवाई उपस्थित होते.

- Advertisement -

लोकज्योती युवक मंडळः विश्वास ठाकूर

लोकज्योती वर्धापन दिन निमित्त एकत्र जमलेले ज्येष्ठ नागरिक मंचाचे सदस्य हे वयाने ज्येष्ठ असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरील उत्साहामुळे लोकज्योती चे हे ज्येष्ठ नागरिकमंच हे युवक मंडळ वाटते, असे उद्गार विश्वास बँकचे विश्वास ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना काढले. ते म्हणाले की, मॉर्डन शैलीत जगणारे मुले-मुली प्रपंचात पडल्यानंतर आई-वडिलांना सोडून देतात. त्यामुळे वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ घालावी लागते. ताण-तणावामुळे आजार बळावतात. तसेच या वयातील दुखणे शेवटपर्यंत पिडा देणारे ठरते. आयुष्यभर ज्यांच्यासाठी कमविण्यासाठी धडपड केली. उतारवयात यातील काही पैसे स्वतःवर खर्च करताना ज्येष्ठ नागरिकांनी चिंता करू नये, जसे जगावेशे वाटले तसेजगावे. आताच्या काळात आदर्श म्हणून फार कमी व्यक्तीमत्व आहेत. त्यात आताची ज्येष्ठ नागरिकांची पिढी आहे. त्यामुळे आताच्या पिढीने ज्येष्ठ नागरिकांचा आदर केला पाहिजे, असे विश्वास ठाकूर म्हणाले.

सांधेबदल शस्त्रक्रियेबदल मार्गदर्शन

कार्यक्रमात डॉ. सुनील सोनार यांनी आरोग्य विषयावर मार्गदर्शन करताना सांधेबदल शस्त्रक्रियेतील आधुनिक पद्धत याची माहिती दिली. तसेच सांध्याचे दुखणे, त्यासाठी आहार,विहार आणि योगासने , व्यायाम याची माहिती दिली. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर घेण्याची काळजी, यावर मार्गदर्शन केले. यावेळी ज्येेष्ठ नागरिकांनी प्रश्न विचारले. त्यांचे शंका समाधान करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -