बुटाच्या लेसने गळा दाबून खून

Nashik
crime
(फोटो प्रातिनिधिक आहे)

सिडकोच्या कारगिल चौकातील आशीर्वाद अपार्टमेंटमधील पाच नंबरच्या फ्लॅटमध्ये पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा बुटाच्या लेसने आवळुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शवविच्छेदन अहवालातून उघडकीस आला. प्रकाश गुलाब अहिरे (४८) असे या व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

हे वाचा – शिक्षण समितीवर कमळ फुलले; धनुष्य भात्यात

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकाश अहिरे यांचे शवविच्छेदन करण्यात आले असता फोरेन्सिक एक्स्पर्ट डॉ. आनंद पवार यांनी प्रकाश अहिरे यांचा कोणी तरी गळा दाबून, तसेच मारहाण करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

हे वाचा – निफाडचा पारा ० अंशावर; द्राक्ष बागांना फटका

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here