शरद पवार उद्या नाशकात

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार हे बुधवार (दि.२८) रोजी नाशिक दौर्‍यावर येत असून ते दिवंगत माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. विनायकदादा पाटील यांचे शनिवारी निधन झाले त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पवार हे बुधवारी नाशिक दौर्‍यावर येत आहेत. विनायकदादा पाटील आणि पवार यांचे अतिशय जिव्हाळयाचे संबध होते. पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात. पवार यांचा नाशिक दौरा दोन तासांचा असेल सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान आडगाव येथील एमईटी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. तेथून ते विनायक दादा पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. साडे बारा वाजेच्या सुमारास हॉटेल एम्रॉल्ड पार्क येथे त्यांचे आगमन होईल. येथून काही वेळ थांबून पुन्हा एमईटी महाविद्यालय येथूल हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे रवाना होतील.