घरमहाराष्ट्रनाशिकसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन ठिणगी; नाशिकमध्ये झळकले बॅनर

सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन ठिणगी; नाशिकमध्ये झळकले बॅनर

Subscribe

मुख्यमंत्री कुणाचा? शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा जुंपली

मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे विधान करुन भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी शिवसेनेला डिवचल्याने सेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी मंगळवारी (ता. १६) भाजप कार्यालयाजवळ ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ असा फलक झळकवला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले.

भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात सोमवारी (ता. १५) सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे विधान केले. वास्तविक, युतीत बिघाड होण्याच्या भीतीने मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही पदाधिकार्‍याने वाच्यता करायची नाही, असे धोरण भाजपने ठरविले आहे. मात्र त्यास छेद देत पांडे यांनी सेनेला डिवचले. त्याची परिणीती फलकबाजीत झाली. भाजपच्या कार्यालय परिसरात सेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी तीन फलक लावून ‘मुख्यमंत्री सेनेचाच होणार’ असे त्यावर नमूद केले. मुंबईत देखील अशा प्रकारचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाल्याचे आता पुढे आले आहे.

- Advertisement -

हे वाचा – राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री

हे देखील वाचा – आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच होणार; बाळासाहेब थोरातांचा दावा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -