लाच घेताना शिवाजी चुंभळेंना एसीबीकडून अटक

कर्मचार्‍यांना कामावर रुजू करुन घेण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना ३ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी अटक केली.

Nashik
Shivaji_Chumble
शिवाजी चुंभळे

कर्मचार्‍यांना कामावर रुजू करुन घेण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना ३ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी अटक केली.

चुंभळे यांनी १० लाखांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३ लाख रुपये ठरल्यानंतर ही लाच त्यांनी स्विकारली. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी १ वाजेच्या दरम्यान त्यांना अटक केली. महापालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती अशी पदे भूषविल्यानंतर विधानसभेसाठीदेखील ते अपक्ष म्हणून उभे होते.