शिवसेना जिल्हा प्रमुखाकडून पावणेदोन कोटींचा अपहार

बनावट कागदपत्रांद्वारे ५० गुंठे जमीन असल्याचे दाखवत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह तिघांनी एकाकडून तब्बल १ कोटी ७३ लाख रुपये लाटल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. जमिनीचा मालकी हक्क प्राप्त नसताना व खरेदी खत होत नसतानाही तिघांनी एकाला विसार पावती बनवून दिली.

Nashik
Fraud

बनावट कागदपत्रांद्वारे ५० गुंठे जमीन असल्याचे दाखवत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह तिघांनी एकाकडून तब्बल १ कोटी ७३ लाख रुपये लाटल्याची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. जमिनीचा मालकी हक्क प्राप्त नसताना व खरेदी खत होत नसतानाही तिघांनी एकाला विसार पावती बनवून दिली. याप्रकरणी खरेदीदार राहुल जाजू यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास द्वारकानाथ कांदे (रा.रामेश्वरनगर, पाईपलाईन रोडजवळ,नाशिक), सचिन आनंद मानकर व संदीप मल्हारी मानकर (दोघेही रा.मानकर मळा, चाडेगाव, नाशिक) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांतील तक्रारीनुसार, वडाळा येथे सर्व्हे क्रमांक ३५ मधील १ ते ५ क्षेत्र क्रमांक १ व २ हे सेटलवाड यांच्या मालकीचे व क्षेत्र ३ ते ५ हे संदीप मानकर व सचिन मानकर यांच्या मालकीचे आहे. त्या क्षेत्रात सुहास कांदे यांनी पैसे गुंतवले असून त्या क्षेत्राची विक्री करायची असल्याचे बांधकाम व्यवसायिक गणेश शंकर अत्रे यांच्या संपर्कातून राहूल जाजू यांना समजले. अत्रे यांनी जाजूंना जमिनीचा सातबाराही दाखवला. त्यानुसार त्यांची कांदे यांच्याशी बोलणी झाली. त्यात रक्कम रोख स्वरुपात द्यावी लागेल, असे कांदे यांनी जाजूंना सांगितले. सुरुवातीला सर्व्हे क्रमांक ३५ मधील ४ चे क्षेत्र १५ गुंठे खरेदी करण्यासाठी सचिन मानकर व संदीप मानकर यांना सेंट्रल बँकेतून ७ लाख ५० हजारांचे दोन डी.डी. व ७६ लाख रूपये रोख स्वरूपात कांदे यांना दिले. त्या बदल्यात जाजूंना १.०९.२०१० ला इसार पावती मिळाली. २४.०९.२०१० ला पुन्हा जाजूंनी तिघांना २० लाख रोख दिले. तिघांनी त्यांना इसार इसार पावती दिली. त्यानंतर जांजूंनी तिघांकडे जागेची खरेदी मागितली. मात्र, प्रत्येकवेळी तिघांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली व खरेदी खत नोंदविण्यास टाळाटाळ केली. तसेच, जाजूंनी मागणी करूनही मोजणीचा नकाशा व इतर कागदपत्रे दिली नाहीत. काही दिवसांनी त्यांना खरेदी खताचा दस्ता मिळाला. सर्व्हे क्रमांकमधील काही जमीन लष्कराच्या हद्दीत असल्याने त्यांना समजले. त्यांनी फेरफार नोंदींची तपासणी केली.

जमीन राज्य शासनाकडे राईट बॅक कॅनॉलसाठी हस्तांतरीत केल्याचे दिसले. जांजूंनी ६.१०.२०१० ला महापालिकेकडून झोनिंग दाखला मिळवला. वडाळा गावातील सर्व्हे क्रमांक ३५ पैकी ३ ते ५ क्षेत्र लष्कराकडे व काही क्षेत्र नाशिक उजवा कालवा विभागात असल्याचे त्यांना दिसले. ५९ गुंठापैकी १९ गुंठे क्षेत्र शिल्लक आहे. त्यामुळे फसवणूक होत असल्याचे जाजूंच्या लक्षात आले. या तिघांनी यादव बारकू आहेर यांचे ५९ गुंठे बनावट जनरल मुखत्यार पत्र बनवले. त्याद्वारे क्षेत्र खरेदी केले. खरेदी नमूद केलेले प्रत्येक २५ लाखांचा धनादेश सचिन मानकर व संदीप मानकरने जागामालक यादव आहेर यांना दिल्याचे दाखवले आहे, मात्र प्रत्यक्षात दोघांनी स्वत:च्या नावे रक्कम काढल्याचे जाजूंनी तक्रारीत म्हटले आहे. मूळ जागामालक शामलाल माणिकलाल व इतर पाचजणांचा शोध घेतला असता यादव आहेर हा माणिकलाल यांच्याकडे सालगडी होता व सद्यस्थितीत सर्व जागामालक हयात नसल्याचे समजले. सचिन मानकर, संदीप मानकर व सुहास कांदे यांनी बनावट कागदपत्राद्वारे १ कोटी ७३ लाख रुपये घेत क्षेत्राची खरेदी करून दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here