घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये शिवसेनेचे ‘एकला चलो रे’, आढावा बैठकीत उपनेते मिर्लेकर यांचा नारा

नाशिकमध्ये शिवसेनेचे ‘एकला चलो रे’, आढावा बैठकीत उपनेते मिर्लेकर यांचा नारा

Subscribe

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पदाधिकार्‍यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी पदाधिकार्‍यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. शहरातील चार विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेत गुरुवारी त्यांनी कार्यकर्त्यांना ‘एकला चलो रे’चा नारा दिला.

शिवसेना उपनेते तथा उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर यांनी गुरुवारी ३१ जानेवारीस नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य व देवळाली विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी शहराध्यक्ष सचिन मराठे, महेश बडवे, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर यांसह शिवसैनिक उपस्थित होते. शालिमार येथील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. सकाळी साडेदहाला नाशिकमध्य मतदारसंघाचा आढावा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले. प्रत्येक मतदारसंघात बुथप्रमुख, विभागप्रमुख यांनी मतदार नोंदणीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. उपविभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांची नियमित बैठक घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सभासद नोंदणीवर लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करा. युती होईल तेव्हा होईल, शिवसैनिक हा सर्वदा निवडणुकांसाठी तयार असतो, अशा शब्दांत त्यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहित केले.

- Advertisement -

यावेळी संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे उपस्थित होते. दुपारच्या सत्रात नाशिक पूर्व मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला. पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आढाव्याप्रसंग़ी सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते. सायंकाळच्या सुमारास देवळाली मतदारसंघाचा आढावा घेत त्यांनी प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार योगेश घोलप, मिलिंद घनगुटकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -