घरमहाराष्ट्रनाशिकधक्कादायक : सुरगाण्यात आढळले १२ मृत कावळे

धक्कादायक : सुरगाण्यात आढळले १२ मृत कावळे

Subscribe

बर्ड फ्लुच्या धसक्यामुळे पशुसंवर्धन विभागाने काही कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवले

सुरगाणा तालुक्यातील पळसमधील उमरदे पाडा येथे जवळपास १२ मेलेले कावळे आढळून आले आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभागाने यातील काही कावळ्यांचे नमुणे तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे यांनी मंगळवारी (दि.१२) प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हयात पहिल्यांदाच मृत कावळे आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पशुसंवर्धन विभागाची धावपळ वाढली आहे. पशुसंवर्धन विभागाने स्थापन केलेल्या शिघ्र कृती पथकाला याबाबत वस्तुस्थिती जमजून घेण्यास सांगितले. या पथकातील सदस्यांनी रात्री जाऊन त्या डोहामधून मृत कावळे बाहेर काढले. त्यातील चार कावळ्यांचे नमुणे घेऊन ते जिल्हा कार्यालयात पाठवले व तेथून ते नमुणे मंगळवारी (दि.१२) पुणे येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.

जिल्ह्यात कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीस पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. कुक्कुट पालन केंद्रांमध्ये कोठेही पक्ष्यांची अतिरिक्त मरतूक झालेली नाही. यामुळे कु्क्कुट पालक व नागरिकांनी घाबरू नये.  – डॉ.विष्णू गर्जे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -