घरमहाराष्ट्रनाशिक७० वर्षात देशातली गरीबी का हटली नाही

७० वर्षात देशातली गरीबी का हटली नाही

Subscribe

पिंपळगाव येथील जाहीर सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा थेट आरोप

विरोधक पंतप्रधानांना सवाल करतात, पाच वर्षात आपण काय विकास केला. पण ज्या लोकांनी ७० वर्ष या देशाची सत्ता उपभोगली त्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात गरीबी का हटली नाही, असा सवाल करत काँग्रेस, राष्ट्रवादीने या देशात जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. पिंपळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

आठवले भाषण करण्यासाठी उभे राहताच त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठवलेंनी खास आपल्या काव्य शैलीत भाषणाची सुरुवात करत आपल्या काव्य शैलीने यथेच्छ फटकेबाजी केली. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याबाबत ते म्हणाले, नाशिकमधील सर्व उमेदवारांना येणार आहे पडसे, कारण नाशिकमध्ये निवडून येणार आहे, हेमंत गोडसे. दिंडोरीच्या विजय रथावर ज्या झालेल्या आहे सवार, त्यांचे नाव आहे, भारती पवार. त्यांच्या या कवितांनी गोडसे, पवार समर्थकांनी उत्स्फूर्त दाद दिली. नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी कविताच सादर केली. नरेंद्र मोदी चौकीदार है लेकिन राहूल गांधी भागिदार हेै, नरेंद्र मोदी विकास पुरुष है, राहुल गांधी भकास पुरुष है. नरेंद्र मोदी फकीर है, राहुल गांधी अमिरों की लकीर है, असे सांगत त्यांनी काँगे्रेस, राष्ट्रवादीवरही काव्यातून तोफ डागली. काँगेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची फार मोठी आमच्याकडे आहे जंत्री म्हणूनच नरेंद्र मोदी होणार आहे प्रधानमंत्री. नागपूरची फारच गोड असते संत्री, म्हणूनच देवेंद्र फडणवीस झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी दलितांच्या विरोधात, संविधानाविरोधात नाही. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला जो विरोध करेल त्याचा सत्यानाश होईल. संविधानाला विरोध करण्याची कोणात हिम्मत नाही. मोदी नेहमी सांगतात डॉ. बाबासाहेबांचे संविधान आहे म्हणून चहा विकणारे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले; परंतु या देशात जाती, धर्मात वाद लावण्याचे काम काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक करत आहेत. ते म्हणतात पंतप्रधान आणि अमित शहांनी भजी तळायला हवे, पण ते आहेत तयार भजी तळायला, पण तुम्ही आहात का तयार पीठ मळायला, असा सवालही त्यांनी केला.

- Advertisement -

पंतप्रधानांवर विरोधकांकडून आरोप केले जातात; परंतु ७० वर्षात आपण काय दिवे लावले, मग देशाची गरीबी का हटली नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, राहुल गांधी सत्तेत आल्यास ७२ हजार रुपये देऊ असे आश्वासन देतात पण तुम्हाला पंतप्रधान कोण बनवणार आहे? शरद पवारांचा तुम्हाला पाठींबा आहे का? शरद पवारांना तुमचा पाठींबा आहे का? यांच्याकडे खूप प्रधानमंत्री आहेत आमच्याकडे एकच उमेदवार आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. काँग्रेसवालों ने देश को धमकाया हेै लेकिन नरेंद्र मोदीजीने देशको चमकाया है. काँगेसवालोने भ्रष्टाचारका अंधेरा दिया है, लेकिन मोदीने विकास से देश का उजाला दिया है, अशा शैलीत त्यांनी कविता सादर केल्या. यावेळी आमदार अनिल कदम, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करजंकर, भाजपचे जिल्हाप्रमुख दादा जाधव, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते.

सभेतून नागरिकांचा काढता पाय

पिंपळगाव येथे सकाळी ९ ला आयोजित सभेसाठी जिल्हाभरातून नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी नियोजित वेळेपेक्षा उशिरा आगमन झाले. त्यातच उन चांगलंच तापू लागल्याने उकाडयाने नागरीक हैराण झाले. दुपारी १२ दरम्यान मोदींचे सभास्थळी आगमन झाले. आयोजकांनी विलंब न लावता सत्कारानंतर थेट मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर काही वेळाने सभेला आलेल्या नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे मोदींनाही भाषण आवरते घ्यावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -