घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट पार्किंग शुल्क: दुचाकीसाठी ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपये

स्मार्ट पार्किंग शुल्क: दुचाकीसाठी ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपये

Subscribe

नाशिकला घरबसल्या आधीच करता येणार पार्किंगची जागा बुक; सध्या 22 ठिकाणी स्मार्ट पार्किंग

शहरामध्ये पार्किंगची गरज लक्षात घेता नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट मार्फत स्मार्ट पार्किंग संकल्पना समोर आली. त्यासाठी शहरातील 33 ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आणि 28 ठिकाणी ऑन स्ट्रीट आणि 5 ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था राबवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली 22 ठिकाणांची स्मार्ट पार्किंगसाठी लवकरच शुल्क आकारले जाणार आहे. दुचाकी वाहनांसाठी प्रत्येकी 5 रुपये प्रतितास तर चार चाकी वाहनासाठी 10 रुपये प्रतितास असे हे शुल्क असेल.
वर्दळीच्या ठिकाणी होणारी गर्दी आणि ना फेरिवाला क्षेत्र या सर्वांचा अभ्यास करून स्मार्ट पार्किंगचा आराखडा बनवण्यात आला. सध्या शहरात 22 ठिकाणी स्मार्ट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 18 ठिकाणी ऑन स्ट्रीट व 4 ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्मार्ट पार्किंग असणार आहे. स्मार्ट पार्किंग जेथे आहे तेथे तेथे सेंसर्स लावण्यात आले आहेत. कोणतीही चार चाकी गाडी स्मार्ट पार्किंगमध्ये उभी केली की ती सेंसरच्या माध्यमातून लक्षात येईल. याद्वारे स्मार्ट पार्किंगच्या नियंत्रण कक्षात कोणत्या वेळेला किती वाहने स्मार्ट पार्किंगमध्ये उभी आहेत याचा माहिती संकलीत होत आहे. ही माहिती भविष्यात नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisement -

पार्किंग आरक्षीत करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप-

पार्किंगचे आरक्षण आधीच करायचे असेल तर त्यासाठी प्रथमत: गुगल प्ले स्टोअरला किंवा आयओएस वरून ‘नाशिक स्मार्ट पार्किंग’ हे अ‍ॅपलिकेशन डाऊनलोड करून ते ऑपरेट करता येणार आहे.

ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंट मोड
स्मार्ट पार्किंगचं शुल्क कुणीही घरबसल्या अदा करू शकणार आहे किंवा प्रत्यक्ष पार्किंगच्या ठिकाणीही ते अदा करता येऊ शकेल. पार्किंच्या अ‍ॅपमध्येच शुल्क भरण्याची व्यवस्था आहे.

व्हर्च्युअल मॅसेज डिस्ल्पे

स्मार्ट पार्किंगच्या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज डिस्ल्पे असणार आहे. म्हणजेच पार्किंगसाठी वाहनचालक संबंधित ठिकाणी पोहचला की, त्याला पार्किंगबद्दलची सर्व माहिती एका डीजीटल डिस्प्लेद्वारे पहायला मिळणार आहे. म्हणजेच आत पार्किंगसाठी किती जागा शिल्लक आहे. ही माहिती गेटवरच मिळाल्याने पार्किंगसाठी जागा शोधण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही.

- Advertisement -

ही आहेत स्मार्ट पार्किंगची २२ ठिकाणं

1. कुलकर्णी गार्डन जवळ साधू वासवानी रोड येथे (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजुला)
2. कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल ऑफीसच्या उजव्या हाताला (ऑन स्ट्रीट पार्किंग)
3. ज्योती स्टोर/ ऋषीकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजुला)
4. प्रमोद महाजन गार्डनच्या पुढील आणि मागील बाजूस (ऑन स्ट्रीट पार्किंग)
5. गंगापूर नाका ते जेहान सर्कल (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजूस)
6. जेहान सर्कल ते गुरूजी हॉस्पिटल (ऑन स्ट्रीट पार्किंग उजवीकडे)
7. जेहान सर्कल ते एबीबी (ऑन स्ट्रीट पार्किंग दोन्ही बाजूला)
8. गुरूजी हॉस्पिटल ते पाईपलाईन रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग डावीकडे)
9. मोडक पॉईंट ते खडकाळी रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग)
10. शालीमार ते नेहरू गार्डन (ऑन स्ट्रीट पार्किंग दोन्ही बाजुला)
11. थत्ते नगर रोड (ऑन स्ट्रीट पार्किंग रस्त्याच्या दोन्ही बाजुला)
12. कुलकर्णी गार्डनच्या मागे (ऑन स्ट्रीट पार्किंग)
13. गाडगे महाराज पूल ते टाळकुटेश्वर (ऑन स्ट्रीट पार्किंग)
14. मॉडेल कॉलनी चौक ते भोंसला गेट (ऑन स्ट्रीट पार्किंग दोन्ही बाजू)
15. पंडित कॉलनी (जुन्या महापालिका कार्यालयासमोर दोन्हा बाजुला ऑन स्ट्रीट पार्किंग)
16. सीबीएस ते शालीमार (दोन्ही बाजुला ऑन स्ट्रीट पार्किंग)
17. श्रध्दा पेट्रोल पंप ते वेस्टसाईड मॉल (ऑन स्ट्रीट पार्किंग)
18. कॅनडा कॉर्नर ते विसेमळा (ऑन स्ट्रीट पार्किंग)
19. बीडी भालेकर हाय स्कूल ग्राऊंड, शालीमार (ऑफ स्ट्रीट पार्किंग)
20. अन्नाशास्त्री हॉस्पिटल (ऑफ स्ट्रीट पार्किंग)
21. अगोरा कॉम्प्लेक्स (ऑफ स्ट्रीट पार्किंग)
22. शताब्दी हॉस्पिटल (ऑफ स्ट्रीट पार्किंग)

स्मार्ट पार्किंग शुल्क: दुचाकीसाठी ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपये
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -