घरमहाराष्ट्रनाशिकभाजपवर तुटून पडणारे राऊत उभे राहतात तेव्हा...

भाजपवर तुटून पडणारे राऊत उभे राहतात तेव्हा…

Subscribe

मेळाव्यात बोलण्यासाठी खासदार संजय राऊत उभे राहताच व्यासपीठासह सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. ‘आता काय बोलू,’ असे मुख्यमंत्र्यांकडे बघून राऊत यांनी बोलण्यास सुरुवात केली. सभागृहात उडालेले हास्याचे फवारे सुरूच असताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असे संबोधताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

मेळाव्यात बोलण्यासाठी खासदार संजय राऊत उभे राहताच व्यासपीठासह सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. ‘आता काय बोलू,’ असे मुख्यमंत्र्यांकडे बघून राऊत यांनी बोलण्यास सुरुवात केली. सभागृहात उडालेले हास्याचे फवारे सुरूच असताना राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असे संबोधताच पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तुम्हाला ’लाडके’ म्हटलं की अशा टाळ्या पडतात, असे सांगत राऊतांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. गेली पाच वर्ष आम्ही भांडत होतो. पण आता युतीचा ‘आ गले लगजा’हा नवा सीनेमा प्रदर्शित झाला असून तो सर्वांनी आवर्जुन पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुरावलेले भाऊ, जत्रेत हरवलेले भाऊ एकत्र येतात तर, आपण एकमेकांसमोर वावरत होतो. त्यामुळे पुन्हा एकत्र येण्यास काहीच हरकत नाही. त्यामागील कारण म्हणजे युती लावते तोच आकडा फुटतो. आता आकडा लावणे म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका, असे राऊत यांनी राम शिंदे यांच्याकडे बघत म्हटले. राऊत म्हणाले की, गेल्या पाच वर्षात झालं गेलं गोदावरीत सोडून देऊ आणि गोदावरी नदीला स्वच्छ करू, नवीन क्रांती घडवू या! असे सांगत युतीचे घोडे गंगेत न्हाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आजोबा-नातवामध्ये भांडण सुरू : महाजन

नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शिवसेना व भाजपमध्ये काही काळ तणाव होता. त्यामुळे विधानसभा, महापालिका, नगरपालिकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो. आता सोबत राहून, हातातहात घालून लोकसभा निवडणूक लढायची आहे. उत्तर महाराष्ट्रातील ८ जागा जिंकायच्या आहेत. आम्ही एकदा कमिटमेंट केली की…विजय निश्चित असतो. युती झाल्यामुळे आता विजय मिळणारच आहे. जागा वाटपाचा तिढा सोडून युतीने प्रचारात पुढाकार घेतला आहे. दुसर्‍या बाजूला बाप लेक अन, आजोबा-नातवामध्ये भांडण सुरू असल्याचे सांगत आघाडीला टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -