घरमहाराष्ट्रनाशिकयूनिफाईड डीसीपीआरची वाट भुजबळ मोकळी करुन देणार

यूनिफाईड डीसीपीआरची वाट भुजबळ मोकळी करुन देणार

Subscribe

सुधारित एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (यूनिफाईड डीसीपीआर) तातडीने मंजूर करुन बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नरेडको(नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलोपमेंट कौन्सील)च्या शिष्टमंडळाला दिली. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेची ऑटो डीसीआर प्रणाली, म्हारेरा यासंबंधी भेडसावणार्‍या अडचणींकरिता नगर विकास विभाग व गृहनिर्माण विभाग यांच्यासमवेत बैठक घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बांधकाम क्षेत्राशी संबंधित नरेडको संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. ११) आ. भुजबळ यांची सदिच्छा घेतली. याप्रसंगी नरेडको सभासंदानी शहर विकास व महसूल विभागाशी निगडित विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तसेच नाशिक शहर व जिल्ह्याच्या विकासासंबधी नवनवीन संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगितले. मागील शासनाच्या कार्यकाळात आकस ठेऊन जुन्या योजनांना संपविण्याचे प्रयत्न केले त्यावर विशेष लक्ष देऊन आघाडी शासनाच्या काळात राबविलेल्या योजनांना चालना देण्याचे सूतोवाच यावेळी भुजबळ यांनी केले. मे २०१९ ला नरेडकोसमवेत झालेल्या बैठकीचा उल्लेखही भुजबळांनी केला. नाशिक महापालीकेची ऑटो डीसीआर प्रणाली, संपूर्ण राज्याकरिता असलेली एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (यूनिफाईड डीसीपीआर), म्हारेरा, यासंबंधी भेडसावणार्‍या अडचणी करिता नगर विकास विभाग व गृहनिर्माण विभाग यांच्यासमवेत बैठक घेऊन संबंधित विषय मार्गी लावण्याची ग्वाही देऊन शहर विकासास चालना देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीवेळी नरेडको नाशिककडून अभय तातेड, सुनील गवादे, शंतनू देशपांडे, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, मयूर कपाटे, रुपेश बागड, अमित खेमानी, जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, सुनील भायभंग, नितीन सोनवणे, शशांक देशपांडे आदी सभासद उपस्थित होते.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्रीपद मिळाल्याबद्दल छगन भुजबळ यांचा सत्कार करताना नरेडकोचे अभय तातेड, सुनील गवादे, शंतनू देशपांडे, राजेंद्र बागड, पुरुषोत्तम देशपांडे, मयूर कपाटे, रुपेश बागड, अमित खेमानी, जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, सुनील भायभंग, नितीन सोनवणे, शशांक देशपांडे
यूनिफाईड डीसीपीआरची वाट भुजबळ मोकळी करुन देणार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -